रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, शिवसेनेची पालिकेकडे जोरदार मागणी

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विकासाची रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने पालिकेकडे आज केली. याबाबत शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी रखडलेली विकासकामे, सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिले.
शिवसेनेच्या मागणीमुळे प्रयाग नगर, प्रकाश नगर, वाशीनाका येथील आरएमसी प्लांटला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तर गव्हाण गाव चेंबूर येथील पाणी प्रश्न सोडवावा, गोवंडी शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण न करता सोयीसुविधा वाढवाव्यात, डॉक्टर-औषध पुरवठा वाढवावा, कोळीवाडा, देवनार गाव या ठिकाणच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणीही करण्यात आली. या वेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभागप्रमुख व आमदार महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, विठ्ठल लोकरे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक गजानन पाटील, निमीष भोसले, नीलम डोळस, निरीक्षक विनायक म्हात्रे, शाखाप्रमुख किरण म्हात्रे, उमेश करकेरा, संदीप वेताळे, महिला शाखा संघटक दक्षता पाताडे, उपविभाग अधिकारी व खासदार प्रतिनिधी रुपेश मढवी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.