पहिले विमानतळावर दिसले अन् आता….; हार्दिक पांड्याने फोटो शेअर करत जाहीर करुन टाकलं!


हार्दिक पंडिया मॅजिक शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्या नुकताच कथित गर्लंफ्रेंड माहिका शर्मासोबत (Mahika Sharma) दिसला. त्यानंतर हार्दिक पांड्याने माहिका शर्मासोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. (Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma Photo)

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मासोबत डेट (Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma Photo) करत असल्याची चर्चा रंगली होती. आता हार्दिकने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून महिकासोबतच्या त्याच्या नात्याचा खुलासा केला आहे. फोटोमध्ये हार्दिक आणि महिका समुद्रकिनाऱ्यावर उभे असल्याचे दिसत आहेत. हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये माहिका शर्माचं नाव लिहित टॅग करत जाहीर केलं आहे. या फोटोवरुन हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकमेकांना डेट करत असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

कोण आहे माहिका शर्मा? (who is mahieka sharma)

माहिका शर्मा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. माहिका शर्मा इंस्टाग्रामवर फॅशन आणि फिटनेस कंटेंट शेअर करते. माहिकाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आणि नंतर अर्थशास्त्र आणि वित्त शिक्षण घेतले. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, माहिकाने अनेक इंटर्नशिप केल्या, ज्यामुळे तिला मॉडेलिंग आणि अभिनय करायला सुरुवात झाली. माहिकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात फ्रीलांसर म्हणून केली. ती रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये अनेक छोट्या भूमिका केल्या, ज्यात “इनटू द डस्क” भाष्य आणि ओमंग कुमारचा चित्रपट “पीएम नरेंद्र मोदी” (2019) यांचा समावेश आहे. माहिका अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. माहिकाने तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि अमित अग्रवाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी वॉक केला आहे. 24 वर्षीय माहिका शर्माला 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज) पुरस्कार देखील मिळाला.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविकचा घटस्फोट-

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) यांचा 18 जुलै 2024 रोजी घटस्फोट झाला होता. हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. या मुलाचे दोघंही मिळून सांभाळ करताय.

संबंधित बातमी:

Natasa Stankovic: नताशा स्टँकोविक अखेर प्रेमात पडलीच…; नाव जाहीर करुन टाकलं, स्टोरी टाकत ‘त्याला’ टॅगही केलं!

आणखी वाचा

Comments are closed.