चिनी उत्पादनांवर 100% टॅरिफ लादण्याची ट्रम्प यांची घोषणा; अमेरिका-चीन व्यापार युद्ध तीव्र होण्याची शक्यता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादल्याने अस्वस्थतेचे वातावरण आहे. आता त्यांनी चीनवरही टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिका नोव्हेंबरपासून चिनी आयातीवर अतिरिक्त 100% कर लादणार आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा व्यापार युद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनविरुद्ध नवीन व्यापार धोरण जाहीर केले. तसेच त्यांनी १ नोव्हेंबरपासून सर्व चिनी आयातीवर 100% अतिरिक्त कर लादण्याची आणि अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर कडक निर्यात नियंत्रणे लादण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव वाढू शकतो. तसेच त्यांच्यातील व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी चीनवर व्यापाराबाबत अति आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप केला आणि अमेरिकाही त्यालाच तसाच प्रतिसाद देईल, असा इशारा दिला.
ट्रम्प यांनी १ नोव्हेंबर २०२५ पासून अमेरिका चीनवर १००% कर लादेल, अशी घोषणा केली आहे. चीन जवळजवळ प्रत्येक उत्पादनावर व्यापक निर्यात बंदी घालण्याची योजना आखत असल्याच्या वृत्तानंतर हा निर्णय घेण्यात आला.
चीनने अपवादात्मक आक्रमक व्यापारी भूमिका स्वीकारल्याचे नुकतेच कळले. याचा परिणाम अपवादाशिवाय सर्व देशांवर होईल आणि त्यांनी हे नियोजन वर्षानुवर्षे केले होते. फक्त अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, समान धोक्यांचा सामना करणाऱ्या देशांबद्दल नाही तर, आम्ही १ नोव्हेंबरपासून सर्व गंभीर सॉफ्टवेअरवर निर्यात नियंत्रणे लादू. याची अंमलबाजवणी झाल्यास इलेक्ट्रॉनिक्सपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्व क्षेत्रांवर परिणाम करू शकते, जे आधीच विद्यमान शुल्काच्या दबावाखाली आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या व्यापार युद्धांनंतर वॉशिंग्टनने घेतलेल्या सर्वात कठोर संरक्षणवादी उपायांपैकी हे एक असेल.
ट्रम्पची ही घोषणा चीनी वस्तूंवर नवीन शुल्क लादण्याचे संकेत देणाऱ्या आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बैठक रद्द करण्याची धमकी देणाऱ्या एका पोस्टनंतर झाली आहे. त्यामुळे बाजारपेठा गोंधळल्या आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध ताणले आहेत.
Comments are closed.