विराटला जमलं नाही ते गिलने करून दाखवलं, शतक झळकावत रचला इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम प्रदर्शन केले आहे. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने 175 धावा करून शानदार डाव खेळला , तर दुसऱ्या दिवशी कर्णधार शुबमन गिलने शतक ठोकले. शतक ठोकतानाच कर्णधार शुबमन गिलने तो असा कारनामा केला जो कर्णधार म्हणून विराट कोहलीसुद्धा करू शकला नाही.
दिल्ली कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलने कमालची फलंदाजी सादर केली. कर्णधार म्हणून शुबमन गिल ही आपली दुसरी कसोटी मालिका खेळत आहेत, पण दुसऱ्या कसोटी मालिकेतच त्यांनी धक्कादायक कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गिलने आपल्या टेस्ट करिअरचे 10वे शतक ठोकले, तर कर्णधार म्हणून हे त्याचे 5वे शतक आहे. फक्त 12 सामन्यांत गिलने कर्णधार म्हणून 5 शतक ठोकले, ही मोठी कामगिरी आहे. विराट कोहलीसुद्धा कर्णधार म्हणून आपल्या करिअरमध्ये इतक्या वेगाने 5 टेस्ट शतक करू शकला नाही.
भारतीय क्रिकेट इतिहासात कसोटी कर्णधार म्हणून सर्वात वेगाने 5 शतक ठोकण्याचा रेकॉर्ड दिग्गज सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड इंग्लंडच्या माजी कर्णधार एलिस्टेयर कुकच्या नावावर आहे, ज्यांनी फक्त 9 डावात हा इतिहास रचला होता.
शुबमन गिलच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतक नोंदले गेले आहेत. यापैकी 5 शतक गिलने एका कॅलेंडर वर्षात ठोकले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध गिलचे हे पहिले टेस्ट शतक आहे. एका कॅलेंडर वर्षात 5 शतक ठोकण्याची कामगिरी टीम इंडियासाठी विराट कोहलीने 2 वेळा केली आहे. कोहलीने ही कामगिरी 2013 आणि 2017 या वर्षांत करून दाखवली होती.
दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 518 धावा करून आपला डाव घोषित केला. जुरेल 44 धावा करून आऊट झाला, तर कर्णधार गिल 129 धावा करून नाबाद राहिला.
Comments are closed.