पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत तसं पॅकेज जाहीर केलं, उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला; पॅकेजची घोषणा ही इतिसातील सगळ्यात मोठी थाप
मुंबईत येऊन पण माननीय पंतप्रधानांनी सुद्धा शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षकर काढलं नाही. त्यांना कल्पना दिली होती की नव्हती? याची कल्पना नाही. जिथे तुम्ही चाललात तिथे विमानतळ आहेत पण शेतकरी सुद्धा आहे. आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाहीत. पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत तसं पॅकेज जाहीर केलं गेलं, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड महायुती सरकारवर कडाडला. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
https://www.youtube.com/watch?v=A9UXVWWWFQIU
मी आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलो होतो. हेक्टरी ५० हजार रुपये ही मागणी माझ्या मनातली नाही ही शेतकऱ्यांची आवश्यकतेची मागणी आहे. माध्यमांमधून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिली आहेत. आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावर कधी आलेलं नव्हतं. पिकांचं नुसतं नुकसान झालेलं नाही तर, जमिनी खरवडून गेलेल्या आहेत. घरं वाहून गेली, संसारच वाहून गेलेला आहे, आयुष्य वाहून गेलेलं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याची आपेक्षा आहे की, किमान हेक्टरी ५० हजार रुपये मदत हवी, जसं पंजाब सरकारने केलं. आणि आता शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे. गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे. साधारणतः हे पिक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला दोन पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती. जेणेकरून पुन्हा रब्बी हंगामासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या. आताची गरज म्हणजे, एकतर जमिनी पूर्ववत करून देणं, कर्जमाफी करणं कारण कर्ज आता हे फेडूच शकत नाही. पहिल्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात ते थांबले तर चक्रवाढ व्याज चढेल. पुढच्या हंगामात पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज… त्याचे हप्ते, हे कर्ज.. याचे हप्ते म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही. सरकारने आता पालकत्वाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईत येऊनपण माननीय पंतप्रधानांनी सुद्धा शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षकर काढलं नाही. त्यांना कल्पना दिली होती की नव्हती? याची कल्पना नाही. जिथे तुम्ही चाललात तिथे विमानतळ आहेत, पण शेतकरी सुद्धा आहे. आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाहीत. पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत तसं पॅकेज जाहीर केलं गेलं. जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की ३१ हजार कोटी… म्हणजे बापरे खूपच झालं. तसं ते नाहीये. अनेक कृषी विषयक तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ विश्लेषण करत आहेत. आणि प्रत्यक्षात ही मदत जे काही त्यांच्या विश्लेषणातून कळलं ती साडेसहा हजार कोटीची आहे. पीकविमा पाच हजार कोटी रुपये देतो असे सरकारने सांगितले. ते पाच हजार कोटी रुपये देणार कसे? ते जे ट्रिगर होते ते काढले आहेत. ते ट्रिगर काढल्याने पिक कापणी आता आहे कुठे? त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची घोषण आहे. आतापर्यंतची इतिसातील सगळ्यात मोठी थाप आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला.
शेतकऱ्यांना आता आसूड हाती घ्यावा लागेल आणि सरकारला वठणीवर आणावे लागेल; उद्धव ठाकरे कडाडले
मुख्यमंत्री म्हणून माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं तेव्हा कोणतंही संकट असं नव्हतं. तरी कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पिककर्जाची कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्जफेड करतो त्याच्यासाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली. आजही त्यांनी २०१७ मध्ये जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे. दुर्दैवाने एक गोष्ट राहिली ती म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला कोरोना आला. कोरोना संपतो ना संपतो आम्ही प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली, या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याचे बारा वाजवले, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. जर का पैशाची कमी वाटत असेल तर, पीएम केअर फंडातून आणा. ३१ हजार कोटींची जी काही फसवी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये जुन्या सगळ्याची बेरीज करून त्यांनी तो आकडा दिलेला आहे. त्यातले बरेचशे पेसे अजून मिळालेलेच नाहीत. आणि मी केवळ कर्जमुक्तीच केली नव्हती दोन-तीन वेळेला चक्रिवादळ आली, पश्चिम महाराष्ट्रात पूर आला, चिपळूणच्या बाजारपेठेत गेलो होतो. या सगळ्या वेळेला महाविकास आघाडी सरकारतर्फे जेवढी मदत करता येणं शक्य आहे एनडीआरएफच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती. आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात दिली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची पूर्ण अंमलबजावणी कशी होते? त्याच्यावर शिवसेना पूर्ण राज्यभर दक्षता पथक नेमेल. गावागावत हे दक्षता पथक असेल. मनरेगातून हे कसे काय उचलून पैसे देणार? तशी तरतूद आहे का? आणि त्यातून साडेतीन लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? तुम्ही साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टरी मनरेगातून मदत करणार असाल तर त्यातले किमान एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
Comments are closed.