IND vs WI: 175 धावा करूनही यशस्वी जयस्वालच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, राहुल द्रविडच्या या यादीत समावेश!

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताने पहिल्याच दिवशी सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. दुसऱ्या दिवशी भारताने 518/5 धावा करून डाव घोषित केला. या दिवशी यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) 175 धावा करून ‘धावबाद’ झाला. त्याचं द्विशतक थोडक्यात राहिलं.

याचसोबत त्याचं नाव एका नकोशा यादीत नोंदवलं गेलं. या यादीत राहुल द्रविड (Rahul Dravid), विजय हजारे (Vijay Hajare) यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) पहिल्या दिवसापासून आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने 258 चेंडू खेळले आणि 175 धावा केल्या. त्यात 22 चौकारांचा समावेश होता. इतकी मोठी खेळी करूनही जयस्वालच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला.

यशस्वीच्या नावाचा त्या फलंदाजांच्या यादीत समावेश झाला, ज्यांनी भारतासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्या आणि शेवटी ‘धावबाद’ झाले.

1989 मध्ये संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) पाकिस्तानविरुद्ध 218 धावा करून धावबाद झाले होते. 2002 मध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) इंग्लंडविरुद्ध 217 धावा करून धावबाद झाले. 2001 मध्ये द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावा केल्या आणि तेव्हाही धावबाद झाले. आता या यादीत यशस्वी जयस्वालचं नाव देखील सामील झालं आहे.

Comments are closed.