राजगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, बचावासाठी तरुणीची दरीत उडी

राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी एका तरुणीने थेट दरीतच उडी घेतली. यामुळे तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणीला सुखरुप वाचवले.

अंजली पाटील असे जखमी तरुणीचे नाव असून तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. राजगडावर काही पर्यटक फिरण्यासाठी गेले असताना संजीवनी माचीजवळ अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे तरुणी घाबरली आणि स्वतःच्या बचावासाठी तिने 40 फूट खोल दरीत उडी मारली. यात तिच्या मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाले.

घटनेची माहिती मिळताच राजगड तालुक्यातील वेल्हे पोलीस, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमने 8 ते 9 तासांच्या अथक प्रयत्नांनी रेस्क्यू मोहीम राबवत तरुणीला सुखरुप वाचवले. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.