कर्मचाऱ्यांना दिवाळीची तब्बल नऊ दिवस सुट्टी, दिल्लीतील ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय


नवी दिल्ली: 2025 मधील दिवाळीला काही दिवस बाकी असताना सर्वांना दीपावलीच्या सणाची उत्सुकता लागलेली आहे. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने गावाकडे जाण्याचे वेध लागलेले आहेत. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने किती सुट्ट्या घ्यायच्या त्याचं काही जणांकडून नियोजन देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतेय. अशातच नवी दिल्लीतील एका कंपनीने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त नऊ दिवसांचे सुट्टी जाहीर केली आहे. या नऊ दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा ईमेल पाहूनये अशा प्रकारचा ईमेलच कंपनीच्या प्रमुखांनी पाठवला आहे. यामुळे कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काही कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम बंदकरून कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामासाठी बोलवल्याच पाहायला मिळतं. काही कंपन्यांच्या कामाच्या डेडलाइन पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव असल्याचं पाहायला मिळत. अशातच दिल्लीतील पब्लिक रिलेशन्स क्षेत्रातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे नऊ दिवसांची सुट्टी दिवाळीसाठी देत असल्याचे जाहीर केले आहे.

दिवाळीनिमित्त नऊ दिवसांची अनपेक्षित सुट्टी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये देखील असं वातावरण आहे. सर्व दिवाळीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना 9 दिवसांची सुट्टी देणाऱ्या कंपनीचे नाव एलिट मार्क आहे. या कंपनीच्या एका महिला कर्मचाऱ्यांना लिंक्डइन वर पोस्ट केली आहे.
“लोक कामाच्या ठिकाणाबद्दल आणि वर्क कल्चरबद्दल खूप बोलतात. खरं कामाचं ठिकाणं आणि वर्क कल्चर असं असतं ज्या ठिकाणी एम्पलॉयर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि  कल्याणाला सातत्याने प्राधान्य देतो, कर्मचारी हे संस्थेच्या यशाचा आणि नवोपक्रमाचा पाया असून ते भरभराट आणू देतो हे ओळखलं जातं.”

संबंधित महिला कर्मचाऱ्यानं त्यांच्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सण त्यांच्या कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी कसा वेळ दिला जातो हे सांगितलं आहे.यानंतर त्या महिला कर्मचाऱ्यानं कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोवर यांचे आभार मानले आहेत.
कंपनीच्या संस्थापकानं कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये नऊ दिवसांचा पूर्णपणे ब्रेक घ्यावा असं म्हटलं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसचे ईमेल पाहू नयेत.सीईओनं कर्मचाऱ्यांबाबत करुणा दाखवत त्यांना आराम करण्याचा, कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आणि गोड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीतील एचआर जे कर्मचाऱ्यांना अपडेट्स देत असतात ते देखील या या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाल्याचे पहायला मिळाले. कंपनीत नव्याने रुजू झालेले कर्मचारी, ते वरिष्ठ अधिकारी या सर्वांना नऊ दिवसाची सुट्टी मिळाली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.