घरात दिवाळीची साफसफाई करताना सापडला खजिना, एकाच वेळी किती लाख मिळाले? नेमकं काय घडलं?


साफसफाई करताना पैसे कमावले: दिवाळी जवळ येताच, प्रत्येक भारतीय लोक घरात स्वच्छता सुरु करतात. स्वच्छता करताना जुने कपडे, जुन्या काही वस्तू तर कधी बालपणीची खेळणी सापडतात. पण एका व्यक्तीला घराची स्वच्छता करताना असा खजिना सापडला ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्यक्तीला दोन लाख रुपये सापडले आहेत. या सर्व 2000 रुपयांच्या जुन्या नोटा आहेत.

दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान सापडला खजिना

जुन्या डीटीएच सेट-टॉप बॉक्स साफ करताना, त्यांच्या आईला 2000 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले, ज्यांचे एकूण 2 लाख रुपये होते. दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान, माझ्या आईला जुन्या डीटीएच बॉक्समध्ये 2000 रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये 2 लाख रुपये सापडले. कदाचित माझ्या वडिलांनी नोटबंदीच्या वेळी त्या लपवल्या असतील. आम्ही त्यांना अजून सांगितलेले नाही. आता, मला सांगा, आपण पुढे काय करावे? असे त्यांने सांगितले आहे. त्या वापरकर्त्याने नोटांचे व्यवस्थित गठ्ठे दाखवणारा एक फोटोही पोस्ट केला. काही तासांतच, ही पोस्ट रेडिटवर व्हायरल झाली, ज्यामुळे मजेदार कमेंट्स, प्रश्न आणि सल्ल्यांचा पूर आला.

पोस्टवर मजेदार प्रतिक्रिया

एका वापरकर्त्याने लिहिले, आहे की, देवा, मला 2 लाख रुपये ठेवून ते विसरण्याचे आशीर्वाद दे. दुसऱ्या एकाने ते पैसे फेकून देऊ नकोस, ते मला दे! काही लोकांचा कचरा हा एखाद्याचा खजिना असतो असं म्हटलं आहे. एखादी व्यक्ती इतके पैसे कसे विसरू शकते? अशा अनेक कमेंट करण्यात आल्या आहेत.

2000 रुपयांच्या नोटा अजूनही बदलता येतात का?

2000 रुपयांच्या नोटा बदलता येतात का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन आहेत, परंतु त्या फक्त आरबीआय कार्यालयातच बदलता येतात, एका वेळी 20000 रुपयांपर्यंत नोटा बदलता येतात. जवळच्या आरबीआय कार्यालयात जा, फॉर्म भरा आणि त्या बदलून घ्या. या नोटा रद्द झालेल्या नाहीत, त्या फक्त चलनातून काढून टाकल्या आहेत. फक्त त्या छोट्या बॅचमध्ये बदलून घ्या.

19 आरबीआय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतात

2016 मध्ये नोटाबंदीनंतर रोख चलन वाढविण्यासाठी 2000 रुपयांची नोट बाजारात आणण्यात आली. मात्र, 2023 मध्ये, रिझर्व्ह बँकेने स्वच्छ नोट धोरणाअंतर्गत ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. बँका 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्या बदलत होत्या. त्यानंतर, 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंतच फक्त 19 आरबीआय कार्यालयांमध्ये बदलता येतात.

महत्वाच्या बातम्या:

2000 रुपयांच्या नोटा बंद तरीही 6266 कोटी रुपयांच्या नोटा चलनात, RBI च्या अहवालातून महत्वाची माहिती समोर

आणखी वाचा

Comments are closed.