कृषीप्रेरणा – स्वप्नपूर्ती करणारी नर्सरी
>> डॉ? जयश्री जाधव–पाऊल, [email protected]
शेतीकाम नको, नोकरी हवी, असा तरुण वर्गाचा असलेला कल सागर दौंड यांनी चुकीचा ठरवलेला आहे? शेती ही आपल्याला स्वप्न पूर्ण करून देणारी 'माए शेरावली' आहे हे सिद्ध झाले? नर्सरीच्या रूपाने सागर दौंड यांचा मां शेरावाली नर्सरीचा प्रवास हा शून्य रुपयापासून पाच कोटी रुपयांच्या व्यवसायापर्यंत पोहोचला आहे?
सागर महेंद्र दौंड यांनी वयाच्या 23 व्या वर्षी मां शेरावाली नर्सरी सुरू केली. नर्सरीचं क्षेत्र अवघ्या सात वर्षांत दहा गुंठय़ापासून ते नऊ एकरपर्यंत वाढविले आहे. नाशिक जिल्हय़ातील निफाड तालुक्यातील लोणवाडी खेडेगावातील सागर दौंड बारावीपर्यंत शिक्षण 2009 मध्ये पूर्ण केल्यानंतर पुढे करायचे काय? पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश तर घेतला, परंतु शिक्षण आपल्याला कधी उत्पन्न मिळवून देईल? या विचाराने नवीन काहीतरी करावे म्हणून मुक्त विद्यापीठाचा संगणकाचा कोर्स केला. त्यानुसार कामाला सुरुवात केली. करत असलेल्या कामातून उत्पन्न किती मिळणार, त्यात प्रवास खर्च, कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी आईवडिलांना किती देणार? यात कोणतेच भविष्य नाही. आपलं शिक्षण पण चालू ठेवायचं नोकरी पण करायची, दुसरा काम सांगेल विचारांची घालमेल सुरू झाली. पुढील शिक्षण बाहेरून घेता येईल का? नियमित मिळणाऱया उत्पन्नात आपला खर्च भागवू शकत नाही हे लक्षात येताच आपल्या स्वतच्या दीड एकर शेतीमध्ये द्राक्ष पिक घेण्याचा विचार केला. त्यातून आलेल्या पैशातून दहा गुंठे जागा विकत घेतली. त्या जागेवर हॉटेल उभे करायचे की नर्सरी अशा द्विधा मनःस्थितीत असतानाच नातेवाईकांनी सांगितले की नर्सरी सुरू करावी. कारण नर्सरीने शेतकऱयांच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे शेतकरी आपल्याशी जोडले जातात.
नर्सरीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आणि ‘मां शेरावाली’ नावाने नर्सरी सुरू केली हे नाव देण्याचे कारण म्हणजे आजोबांचं स्वप्न होतं. त्या जागेवर काम करत असताना बँक ऑफ महाराष्ट्राचे 15 लाखांचे कर्ज घेतले. त्या कर्जातून अतिशय शास्त्रशुद्ध पॉलिहाऊस, नेट हाऊस याचे क्षेत्र हळूहळू वाढवण्यास सुरुवात केली. नर्सरीचे काम अतिशय मेहनतीने केल्याने यश मिळत गेले. आज नर्सरीचे क्षेत्र दहा गुंठय़ांपासून नऊ एकरपर्यंत पोहोचले. आज जवळपास 15,000 शेतकऱयांना भाजीपाला आणि इतरही पिकांची लागवड करण्यासाठी अत्यावश्यक असणारे कोबी, फ्लावर वांगी, टरबूज असे वेगवेगळे रोपे तयार करून विकण्याचे काम केले जाते.
थोडय़ाच दिवसात बँक ऑफ महाराष्ट्राचे घेतलेले कर्ज पूर्ण फेडले. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने पुन्हा मदत केली आणि सिन्नरकडे पाच एकर नर्सरीसाठी क्षेत्र घेऊन आता लोणवाडी ते सिन्नर अशा दोन ठिकाणी या नर्सरीचे कामकाज जोरात सुरू आहे.
कामाचे स्वरूप वाढले त्यानुसार मॅनेजर, सुपरवायझर, सेल्स आणि इतर सर्व काम करणारे कारागीर… सीझनमध्ये 70 लोकांचा स्टाफ काम करतो. इतर वेळी 30 लोक हे नर्सरीमध्ये काम करतात. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कामगारांना नियमानुसार त्यांचा रोज आणि वेतन दिलं जातं. घरच्या जुन्या किराणा दुकानातदेखील काही दिवस सागर यांनी काम केले, परंतु यात फक्त घरखर्च भागेल. म्हणूनच आपल्या मोठय़ा स्वप्नपूर्तीसाठी नवीन यशाचा मार्ग स्वीकारला आणि तो यशस्वीही झाला. आई, पत्नी, भाऊ असे संपूर्ण कुटुंब एकजुटीने काम करतात. नर्सरीची सुरुवात झाली तेव्हा आई चंद्रकला दौंड यांची सागरला खूप मदत झाली. तसेच कालांतराने सागर याची धावपळ व्हायची म्हणून छोटा भाऊ विक्रमला त्यांचे शिक्षण बीएससी अर्धवट सोडून नर्सरीचे ऑफिस सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. व आता पत्नी स्नेहा सर्व हिशोब सांभाळते. त्यामुळे आज नर्सरी यशस्वीपणे आपला बिझनेस वाढवत आहे. अनेक कुटुंबांची चूल या नर्सरीमुळे पेटली जात आहे. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचे कार्य आज सागरने पूर्ण केले आहे.
शिक्षणानंतर नोकरी लागावी आणि दहा-पंधरा हजार रुपयांच्या नोकरीत आपला खर्चही भागत नाही याची जाणीव ठेवूनच वेळेतच तरुणांनी जर व्यवसायाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून प्रशिक्षण घेतले आणि स्वतचा व्यवसाय सुरू केला तर अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारे आपण चांगले उद्योजक बनतो, हे सागर दौंड यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. सागर दौंड यांची कहाणी ही अनेकांना प्रेरणादायी आहे. अनेक शेतकरी शेतीमध्ये उत्पन्न येत नाही, शेती हा जुगार आहे असं मानतात. त्याच शेतीमध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी किती संधी आहे. फक्त जिद्द आणि चिकाटी असेल तर आजचा तरुण हा उद्याचा मोठा उद्योजक बनू शकतो, हे सागर दौंड यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
शेतकाम नको, नोकरी हवी, असा तरुण वर्गाचा असलेला कल सागर दौंड यांनी चुकीचा ठरवलेला आहे. शेती ही आपल्याला स्वप्न पूर्ण करून देणारी मां शेरावाली आहे हे सिद्ध झाले. नर्सरीच्या रूपाने सागर दौंड यांचा मां शेरावाली नर्सरीचा प्रवास हा अर्थातच शून्य रुपयापासून सुरू झालेली उलाढाल पाच कोटी रुपयांच्या व्यवसायापर्यंत पोहोलेली आहे. यशस्वी सागरचा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे. सर्व स्थरातून सागरचे कौतुक होत आहे. बारावीनंतर पुढे शिक्षण घेण्याऐवजी आज सागर नर्सरीचेच उच्च तंत्रज्ञान असलेले प्रशिक्षण घेणे, नर्सरीसाठी आयोजित वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये नवीन तंत्रज्ञान शिकणे हेच त्याचे शिक्षण आहे, की जे त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे ठरते. सागरच्या यशोगाथेतून अनेक तरुणांना नवी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळते. लहानशा गावातील हा तरुण आज समाजासाठी प्रेरणास्थान ठरला आहे. कष्ट, चिकाटी आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला तर यशस्वी होण्याचे सागर सत्य उदाहरण आहे.
(लेखक?चहा?एच?मी? कॉलेज नाशिक येथे अर्थशास्र प्राध्यापक आहेत.)
Comments are closed.