मुलगा होण्याच्या इच्छेसाठी …

भारतात आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक महत्व दिले जाते, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला मुलगाच व्हावा, ही भावना केवळ पित्याचीच नव्हे, तर मातेचीही असते. त्यामुळे मुलगा होईपर्यंत प्रयत्न केले जातात. आधी मुलगी झाली, तर मुलगा होण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जातात. सध्या याच संदर्भातला एक व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. त्यात एक दांपत्य दाखविण्यात आलेले असून पतीला पत्नीपासून मुलगाच हवा असतो, असे या व्हिडीओत दर्शविले आहे.

या दांपत्याला प्रथम मुलगी होते. त्यामुळे पुढच्या वेळी मुलगा होईल यासाठी आणखी एक ‘चान्स’ घेतला जातो. दुसऱ्यावेळीही मुलगीच पदरी पडते. तरीही हे दांपत्य मुलासाठी प्रयत्न करतच राहते. अशा प्रकारे पाच मुली झाल्यानंतर, त्यांच्या पाठीवर एक मुलगा त्यांना होतो आणि घरात आनंदीआनंद होतो, हे या या व्हिडीओत सांकेतिक स्वरुपात दर्शविण्यात आले आहे. वास्तविक सध्याच्या काळात मुलासाठी जास्तीत जास्त दोनवेळा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या वेळीही मुलगीच  झाली, तर बहुतेक मध्यमवर्गीय दांपत्ये तेव्हढ्यावरच थांबतात. पण या व्हिडीओत पत्नीची सहा बाळंतपणे सांकेतिक पद्धतीने दर्शविण्यात आली आहेत. तसेच पहिल्या पाच मुलींचे दर्शनही त्यात घडते. नंतर सहावा मुलगा झाल्यानंतर या दांपत्याच्या आनंदाला कसा पारावार उरत नाही, हे देखील दर्शविण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. तो इंटरनेटरव जवळपास 2 कोटी लोकांनी पाहिला आहे. तर त्याला 90 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. दर्शकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  काही जणांनी पतीला दोष दिला आहे. पुत्र होण्याची इच्छा  पूर्ण करुन घेण्यासाठी त्याने पत्नीवर अन्याय केला असे काहींचे म्हणणे आहे, तर काहींनी त्याची प्रशंसा केली आहे.

Comments are closed.