इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का, टीम इंडियाचं भविष्य अंधारात
आयसीसी महिला वर्ल्ड कप पॉईंट्स टेबल अद्यतनः महिला विश्वचषक 2025 मधील 12व्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 89 धावांनी (England beat Sri Lanka) पराभव करून विजयरथाची हॅट्ट्रिक साधली. इंग्लंडच्या या धमाकेदार विजयानंतर गुणतालिकेत (ICC Womens World Cup Points Table) मोठी उलथापालथ दिसत आहे, कारण थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का बसला आहे. इंग्लंडने (England Women Team) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला (Sri Lanka Women Team) अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. सलग तीन सामन्यांतील पराभवानंतर तिच्या गळ्यातून विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका वाढला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेसमोर 254 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेची संपूर्ण टीम 45.4 षटकांत 164 धावांवर गारद झाली.
इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का (ICC Womens World Cup Points Table Update)
महिला विश्वचषक 2025 मध्ये इंग्लंडने सलग तीन विजय मिळवत 6 गुणांसह पहिल्या स्थानी मजल मारली आहे. तिचा नेट रनरेट +1.864 इतका आहे. दुसऱ्या स्थानावर 5 गुणांसह ऑस्ट्रेलिया (Australia Women Team) आहे. ऑस्ट्रेलियाने 3 सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारत (Team India) सध्या तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या खात्यात 3 सामन्यांतून 4 गुण आहेत (2 विजय, 1 पराभव). चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका (South Africa) आहे, जिनेही 3 सामन्यांतून 2 विजय आणि 1 पराभव घेतला आहे, पण तिचा नेट रनरेट -0.888 असल्याने ती भारतापेक्षा मागे आहे. यानंतर गुणतालिकेत अनुक्रमे न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांचा क्रम लागतो. ग्रुप स्टेजनंतर अव्वल चार संघांना सेमीफायनलसाठी पात्रता मिळणार आहे.
भारताकडे अव्वल क्रमांकावर झेप घेण्याची सुवर्णसंधी
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, आज भारतीय संघाला अव्वल क्रमांकावर झेप घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले असून संघाच्या खात्यात 4 गुण आहेत. मागील सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागला होता.
आज, म्हणजेच रविवार, 12 ऑक्टोबर, भारताचा चौथा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. जर टीम इंडियाने पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचायचे असेल, तर केवळ विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. भारताने आज ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला, तर त्याच्या खात्यातही 6 गुण होतील. पण इंग्लंडला मागे टाकण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियावर मोठ्या नेट रन रेटने विजय मिळवावा लागेल. पण जर भारताचा पराभव झाला तर भविष्य अंधारात जाईल आणि सेमीफायनलचं समीकरण चुरशीचं होईल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.