क्रिकेटविश्व हादरलं! नामीबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं; क्रिकेटमधील भलामोठा भलामोठा उलटफेर


नामीबियाने दक्षिण आफ्रिका टी 20 सामन्यात विजय मिळविला: असं अनेक वेळा घडलं आहे की छोट्या संघांनी मोठ्या संघांना आश्चर्याचा धक्का दिला आणि त्यांच्यावर विजय मिळवला. वर्ल्ड कपच्या स्पर्धांमध्ये आपण हे अनेकदा पाहिलं आहे. जर आठवत असेल, तर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. त्याचप्रमाणे, 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवलं होतं. तर 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. आता याच मालिकेत, नामिबियानेही दक्षिण आफ्रिकेला हरवून एक मोठा उलटफेर घडवून आणला आहे.

12 ऑक्टोबर हा दिवस दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस ठरला. नामिबियाविरुद्धच्या एकमेव टी20 सामन्यात आफ्रिकन संघाला 4 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 134 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर, नामिबियाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत ऐतिहासिक विजय (Namibia wins first ever T20I against South Africa) नोंदवला. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला टी-20 क्रिकेटमध्ये एखाद्या असोसिएट देशाकडून हा पहिलाच पराभव पत्करावा लागला आहे. हे पहिल्यांदाच नाही की नामिबियाने आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या देशाला हरवले आहे. याआधी त्यांनी श्रीलंका, झिंबाब्वे आणि आयर्लंड या संघांवरही विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच नामिबिया संघ 2026 टी-20 विश्वचषकासाठी पात्र झाला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, डोनोव्हन फरेरा यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघाने 134 धावांपर्यंत मजल मारली. त्याच्याकडून जेसन स्मिथने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर नामिबियासाठी गोलंदाजीत रुबेन ट्रंपलमन सर्वात यशस्वी ठरला, त्याने 4 षटकांत फक्त 28 धावा देत 3 विकेट घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची अवस्था एका टप्प्यावर चिंताजनक होती. त्यांनी 84 धावांवर 5 गडी गमावले होते. मात्र विकेटकीपर जेन ग्रीन याने सामनाच फिरवला. त्याने 23 चेंडूत नाबाद 30 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या जबड्यातून विजय हिसकावला. रुबेन ट्रंपलमन (11 नाबाद) यांनीही त्यांना उत्तम साथ दिली.

अखेरच्या षटकाचा थरार, हव्या होत्या 11 धावा

नामिबियाला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 11 धावा हव्या होत्या. जॅन ग्रीनने पहिल्या चेंडूवर षटकार मारला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव वाढला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर दोन धावा. चौथ्या चेंडूवर एक धाव आली, ज्यामुळे दोन्ही संघांना बरोबरीत आणले. पाचवा चेंडू डॉट ठरला, ज्यामुळे रोमांचक कमालीचा वाढला. पण शेवटच्या चेंडूवर ग्रीनने चौकार फटकावत नामिबियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा विजय नामिबियाच्या क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षण ठरला आहे.

हे ही वाचा –

World Cup Points Table : इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का, टीम इंडियाचं भविष्य अंधारात, Points Table मध्ये मोठी उलथापालथ

आणखी वाचा

Comments are closed.