संघासाठी जीव धोक्यात घालून लढला, पण एका चेंडूनंतर व्हीलचेअरवरून मैदान सोडावे लागले, LIVE मॅचमध्
रहमत शहा व्हीलचेयरवर का जायचे: अफगाणिस्तान आणि बांग्लादेश (Afghanistan ODI series against Bangladesh) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अबूधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर झाला. या रोमांचक आणि लो-स्कोरिंग सामन्यात अफगाणिस्तानने 81 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात अफगाणिस्तानचा एक महत्त्वाचा खेळाडू गंभीर जखमी झाला आणि मैदानावर एक नकोसा प्रसंग पाहायला मिळाला.
रहमत शाहला गंभीर दुखापत, पण संघासाठी लढला…
या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज रहमत शाह (Rahmat Shah News) याला डाव्या पायाच्या पिंडरीत गंभीर दुखापत झाली. ही घटना मैदानावर सनसनाटी ठरली, कारण रहमतला अखेर व्हीलचेअरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. झालं असे की, अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू असताना रहमत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. 15व्या षटकात त्याने एक शॉट खेळला आणि सिंगल घेण्यासाठी धावत सुटला. पण धावत असतानाच त्याच्या पायात अचानक तीव्र वेदना झाल्या. त्या वेळी तो फक्त नऊ धावांवर खेळत होता. रहमतला चालणेही कठीण झाले होते. परिणामी त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ व्हावे लागले.
पासून शुद्ध समर्पण @रहमातशाह_08ज्याने आपले शरीर आपल्या देशासाठी लाइनवर ठेवले होते, जेव्हा तो चालत होता तेव्हा फलंदाजीसाठी बाहेर पडतो. 👏👏#Afghanatalan | #Afgvban2025 | #ग्लोरियसनेशन व्हिक्टोरियसटेम pic.twitter.com/bydm8akhzz
– अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (@acbofficial) 11 ऑक्टोबर, 2025
एका चेंडूनंतर व्हीलचेअरवरून मैदान सोडावे लागले…
रहमत शाह मैदानाबाहेर गेल्यानंतर अफगाणिस्तानची फलंदाजी ढासळली. मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग एक बाद झाले आणि विकेट्सचा सिलसिला सुरूच राहिला. शेवटचा विकेट पडल्यावर रहमतने पुन्हा मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रेक्षकांनी त्याच्या या जिद्दीला दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. पण त्याचे नशीब साथ देईना, तो एकच चेंडू खेळू शकला आणि पुन्हा तीव्र वेदनेने जमिनीवर पडला आणि पिंडरी पकडून पडून राहिला. अखेरीस त्याला व्हीलचेअरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.
रहमत शहा यांनी आम्हाला आठवण करून दिली#Afgvban pic.twitter.com/rn4zvems9y
– फॅनकोड (@फॅनकोड) 11 ऑक्टोबर, 2025
अफगाणिस्तानची शानदार विजय
पहिली फलंदाजी करत अफगाणिस्तानने 190 धावा केल्या. रहमत शाह रिटायर्ड हर्ट झाला, तर सलामीवीर इब्राहिम जदरानने शानदार 95 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 3 बळी घेतले. मात्र, बांगलादेशचा संपूर्ण संघ केवळ 109 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने 17 धावांत 5 गडी बाद करत विजय निश्चित केला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशी बरोबरीत आहेत. निर्णायक सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाईल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.