सुलतान जोहर कप हॉकी – हिंदुस्थानचा ब्रिटनवर थरारक विजय

हिंदुस्थानी ज्युनियर पुरुष हॉकी संघाने सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने ब्रिटनवर ३-२ गोल फरकाने थरारक विजय मिळविला.

हिंदुस्थानकडून कर्णधार रोहित (४५व्या, ५२व्या मिनिटाला) आणि रवनीत सिंग (२३व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी मायकल रायडन (२६व्या मिनिटाला) आणि कॉनर ड्रेस्सी (४६व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

पाहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक हॉकी सादर केली; परंतु कोणालाही गोल करता आला नाही. हिंदुस्थानला १३व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉ र्नर मिळाला, जो ब्रिटिश बचावाने रोखला. २२व्या मिनिटाला मनमीत सिंगचा शॉट गोललाइनवरून क्लिअर करण्यात आला; पण लगेचच रवनीत सिंगने अप्रतिम फिनिशसह हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. २६व्या मिनिटाला मायकल रायडनने ब्रिटनसाठी समतोल गोल साधला आणि मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

४५व्या मिनिटाला हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार रोहितने स्ट्रिक ड्रॅग-फ्लिकद्वारे गोल करत हिंदुस्थानला पुन्हा आघाडी स्पर्धा मिळवून दिली. ४६व्या मिनिटाला ब्रिटनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्यावर कॉनर ड्रेस्सीने गोल करत स्कोर २-२ केला.

यानंतर हिंदुस्थानने सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यातील तिसऱ्या संधीवर ५२व्या मिनिटाला रोहितने जोरदार शॉट मारत निर्णायक गोल केला आणि हिंदुस्थानला सामना ३-२ ने जिंकून दिला. हिंदुस्थानचा पुढील सामना आज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Comments are closed.