भाईगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई होणारच; फडणवीसांनी ‘फ्री हँड’ दिल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त काय

द्रुत वाचन दर्शवा

एआय द्वारे व्युत्पन्न केलेले मुख्य मुद्दे, न्यूजरूमद्वारे सत्यापित

नाशिक सीपी संदीप कर्निक: गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात व पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) एक अॅक्शन प्लान आखून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांत गुंतलेल्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसांकडून केला जात आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना कारवाईसाठी मोकळीक दिली आहे. कुणी कोणत्याही पक्षाचा असो, त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपाचा असला तरीही त्याच्यावर कारवाई करा. कुणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता, तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी नाशिक शहरातील गुन्हेगारीवर (Nashik Crime) होणाऱ्या कारवाईसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

संदीप कर्णिक म्हणाले की, गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारीमध्ये अनैसर्गिक वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हला फ्री हॅन्ड दिला आहे. नाशिककरांनी आमच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. सर्वच राजकिय पक्षातील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर काम करतोय. एक ग्रुप स्थापन करणे, गँग तयार करणे, गरीब लोकांची पिळवणूक करणे, त्यांच्या जमिनी, टपऱ्या हडप करणे यासंदर्भात कारवाई केली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Nashik CP Sandeep Karnik: कारवाई भविष्यात आणखी कठोर होणार

तर आपल्या भागातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणीही होर्डिंग्ज लावून भाईगिरीचे प्रदर्शन करत असेल किंवा शांतता भंग करत असेल, तर त्यांच्याविरोधात पोलिसांकडून तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देखील संदीप कर्णिक यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण शहरात टवाळखोरांवर, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुख्यात गुन्हेगारांवरही गुन्हे दाखल करून त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे. ही कारवाई भविष्यात आणखी कठोर होणार असल्याचे कर्णिक यांनी स्पष्ट केले.

Nashik CP Sandeep Karnik: कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

पोलीस आयुक्त कर्णिक यांनी पुढे सांगितले की, नाशिक शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावून जर कोणी भाईगिरी करत असेल, मद्यधुंद अवस्थेत दंगल करत असेल किंवा टवाळखोरी करत शांतता भंग करत असेल, तर नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. पोलिसांचा पाठिंबा सदैव नाशिककर नागरिकांसोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Nashik Crime: गुंडांची उलटी गिनती सुरु! गुन्हेगारांना ‘राजाश्रय’ देणाऱ्यांना मोडून काढा; फडणवीसांकडून नाशिक पोलीस आयुक्तांना ‘फ्री हँड’

आणखी वाचा

Comments are closed.