ग्रीट बंधनन: जगनाराराचे नायक, मुळे विना, जगातील जुने गोलार्ध

जगभरात अनेक आश्चर्य आहेत. ज्यात नैसर्गिक गोष्टींचादेखील समावेश आहे. वटवृक्ष हे दीर्घकाळ जगणाऱ्या झाडांपैकी एक आहे. जे केवळ भारतातचं नव्हे तर जगभरात ठिकठिकाणी दिसून येते. पण तुम्हाला माहितेय का? जगभरातील सर्वांत मोठे आणि जुने वटवृक्ष आपल्या देशात आहे. इतकेच नव्हे तर या झाडाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदसुद्धा आहे. या झाडाला ‘द ग्रेट बनियन ट्री’ म्हणून ओळखले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या झाडाची मुख्य मुळे नष्ट झाली असूनही हे झाड मोठ्या डौलात उभे आहे. (strange things in india lets learn about The Great Banyan Tree of Kolkata)

कुठे आहे?

पश्चिम बंगालमध्ये हावडा शहरातील आचार्य जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डनमध्ये ‘द ग्रेट बनियन ट्री’ आहे. ऐतिहासिक दाखल्यानुसार, 1787 मध्ये या झाडाची लागवड झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी हे झाड केवळ 20 वर्षांचे होते. अर्थात आज हे झाड 258 वर्षांचे आहे. हे झाड जसजसे मोठे होत गेले तसतशी त्याची मुळे संपूर्ण जंगलात पसरली. यामुळे झाडासमोर उभे राहिले असता जंगलात आल्याचा भास होतो. सुमारे 14,500 चौरस मीटरमध्ये पसरलेले हे झाड जवळपास 24 मीटर इतके उंच आहे. त्याच्या पारंब्या 3000 पेक्षा जास्त आहेत. ज्या मुळाप्रमाणे जमिनीत खोलवर गेल्या आहेत. म्हणूनच या झाडाला ‘वॉकिंग ट्री’ नावानेही ओळखतात.

नैसर्गिक आपत्तीशी टक्कर

उपलब्ध माहितीनुसार, 1925 मध्ये कोलकात्यात मोठे चक्रीवादळ आले होते. यात महाकाय वटवृक्षाचे मोठे नुकसान झाले. या झाडाच्या अनेक फांद्या गळल्या. काही कापाव्या लागल्या. या वादळात झाडाची मुख्य मुळे नष्ट झाली. ज्यामुळे खरंतर झाडाची वाढ होणे अशक्य होते. मात्र, हे झाड आजही मोठ्या डौलात आपल्या भव्य स्वरूपात उभे दिसते.

पक्षांना निवारा ते टपाल तिकीट

इतकेच काय तर या झाडावर 80 पेक्षा जास्त प्रजातींचे विविध पक्षी वास्तव्य करतात. त्यामुळे या वटवृक्षाची देखभाल करण्यासाठी सरकारने तज्ञांची टिम तैनात केली आहे. ज्यात बॉटनिस्टपासून माळीपर्यंत अनेकांचा समावेश आहे. जे या झाडाची वेळोवेळी तपासणी करतात आणि त्याची काळजी घेतात. विशेष म्हणजे, 1987 मध्ये भारत सरकारने या वटवृक्षाला बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे प्रतीक म्हणून घोषित केले होते. त्याचसोबत या झाडाचे चित्र असलेले टपाल तिकीटदेखील जारी करण्यात आले होते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=to4sp6wsu-s

Comments are closed.