समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत न्याय मिळेल तेव्हाच बाबासाहेबांचे सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल – सरन्यायाधीश गवई

समाजाच्या शेवटच्या घटकाला कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत न्याय मिळेल तेव्हाच बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालूक्यात दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालयाच्या इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण करण्यात आले. यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. न्यायदान कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले. त्यानंतर येथील ग्रंथालयाचे उद्घाटन आणि पहाणी सरन्यायाधीश गवई तसेच उपस्थित मान्यवरांची आवर्जून केली.
Comments are closed.