IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध मालिकेपूर्वी मिचेल मार्शचा मोठा खुलासा, जाणून घ्या काय म्हणाला?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर लगेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. ऑस्ट्रेलियाच्या टीमला त्यांच्या नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) अनुपस्थितीची जाणीव होणार आहे.
कमिन्सच्या जागी वनडे फॉरमॅटमध्ये अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchel Marsh) कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणार आहे. मार्शची टीम सध्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत आहे. या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्शने मोठे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियाची टीम सध्या ऍशेस मालिकेची तयारी करत आहे. या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मजबूत भारतीय संघाविरुद्ध खेळायचे आहे. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणार आहे. दोन्ही संघ फॉर्ममध्ये असल्यामुळे हा सामना रोमांचक होईल.
टीम इंडिया विरोधात वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने सांगितले, आमचे सर्व खेळाडू ऍशेससाठी तयारी करत आहेत, पण सर्वांना भारताविरुद्ध खेळायला आवडते. आमच्यातील स्पर्धा खूपच छान आहे आणि एका संघाप्रमाणे आम्ही टीम इंडियाचा खूप सन्मान करतो. मला वाटते, ऍशेस मालिकेपूर्वी भारताविरुद्ध खेळणे अगदी योग्य वेळ आहे. हे एक खूप मोठे आव्हान ठरणार आहे.
Comments are closed.