मोहसिन नकवी यांच्याभोवती जमावाची गर्दी, पाक सैन्याच्या येण्याने टळली मोठी अडचण!
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी हे एसीसी (आशियाई क्रिकेट परिषद) प्रमुखही आहेत. त्यामुळे ते भारतीय संघाला ट्रॉफी देऊ इच्छित होते. पण ते पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत आणि त्यांनी भारताविरोधात अनेक वाईट वक्तव्ये केली होती. त्यामुळे सूर्यकुमार यादवने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. नकवी त्यांच्यासोबत ट्रॉफी घेऊन निघून गेले. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. आता मोहसिन नकवी या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांपासून वाचू शकत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या देशात लोक त्यांना घेरत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत.
मोहसिन नकवी पाकिस्तानमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरले असून, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ते एका रिसेप्शनला सहभागी होण्यासाठी गेले होते, तेव्हा लोकांनी त्यांना घेरले. त्यांना विचारण्यात आले की आशिया कप ट्रॉफीचं काय होणार? सूर्यकुमार यादव म्हणाले आहेत की त्यांनी ट्रॉफी घेण्यास नकार दिला नव्हता. या सगळ्या प्रश्नांवर नकवी काहीही बोलू शकले नाहीत.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. तरीसुद्धा भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. भारतीय खेळाडू मैदानावर ट्रॉफीच्या प्रतीक्षेत उभे होते. प्रत्यक्षात सूर्या मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घ्यायची इच्छा नव्हती. त्याने मागणी केली होती की दुसरे कोणते अधिकारी ट्रॉफी देतिल. त्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन थेट स्टेडियममधून निघून गेले होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये मोहसिन नकवी यांना विचारलं जात आहे की आशिया कप स्पर्धेचं भविष्य काय आहे? त्यांना विचारण्यात आलं की सूर्यकुमार यादव तर म्हणत आहेत की त्यांनी ट्रॉफी घेण्यास नकार दिला नव्हता. मग यावर तुमचं मत काय आहे? पण पीसीबी अध्यक्ष मात्र निर्लज्जपणे शांत राहिले आणि फक्त हसत बसले. लोकांनी त्यांना घेरल्यावर पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना कारपर्यंत सुरक्षित पोहोचवलं.
बीसीसीआय हे प्रकरण आयसीसीच्या बैठकीत मांडणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या महाभियोगाचीही मागणी केली आहे. याआधी मोहसिन नकवी यांनी बीसीसीआयला सांगितलं होतं की सूर्यकुमार यादव त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन ट्रॉफी घेऊ शकतात. मात्र बोर्डाने याला ठाम नकार दिला. बीसीसीआयचं म्हणणं होतं की जेव्हा मैदानावर नकवींकडून ट्रॉफी घेण्यात आली नाही, तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ट्रॉफी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
Comments are closed.