वेस्टइंडीज विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यावर सुद्धा टीम इंडिया नंबर 1 रँकवर पोहोचणार नाही? जाणून घ्या कारण

भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (Team india) मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताने पहिला सामना जिंकला आहे आणि दुसरा सामना जिंकण्याच्या जवळ आहे. दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळला जात आहे.

जर टीम इंडियाने हा सामना देखील जिंकला, तरी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप (WTC) पॉइंट्स टेबलवर संघाला फार फायदा होणार नाही. सध्या टीम इंडिया (Team india) तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मालिका जिंकली तरीही तिसऱ्या स्थानावरच राहणार आहे.

सध्याच्या WTC पॉइंट्स टेबलनुसार ऑस्ट्रेलियाकडे 100% पॉइंट्स आहेत, श्रीलंकेकडे 66.67% पॉइंट्स आहेत, तर टीम इंडियाचे सध्या 55.56% पॉइंट्स आहेत. जर भारताने वेस्टइंडीजविरुद्ध मालिका जिंकली, तर टीम इंडियाचे पॉइंट्स अंदाजे 61.90% होईल. त्यामुळे भारताला तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागेल.

Comments are closed.