अमेरिकेत दक्षिण कॅरोलिनातील बारमध्ये गोळीबार, 4 जणांचा मृत्यू; 20 जण जखमी

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील बारमध्ये रविवारी गोळबाराची घटना घडली. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट हेलेना बेटावरील विलीज बार अँड ग्रिलमधील एका ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अनेक लोक जखमी अवस्थेत आढळून आले. पीडितांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. दरम्यान, कोणत्या कारणातून हा गोळीबार याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

Comments are closed.