मुंबई टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून

साखळी आणि बाद पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या मुंबई टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होईल. श्री कोकण क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेत आठ संघांना प्रवेश देण्यात येणार असून साखळी आणि बाद पद्धतीचे सामने दोनदिवसीय आणि अंतिम सामना तीन दिवसाचा खेळवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येईल. दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
स्पर्धेतील उद्घाटनीय सामना म्हात्रेपाडा क्रिकेट मैदान येथे स्पोर्ट्सफिल्ड यंगस्टर विरुद्ध वासू परांजपे क्रिकेट क्लब या दोन संघांत खेळवण्यात येईल. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूस आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेदरम्यान सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी धनंजय चाळके यांच्याशी 869308555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments are closed.