Beauty Tips: शिजलेल्या डाळीचे पाणी त्वचेसाठी असते फायदेशीर
खराब जीवनशैलीमुळे अनेकदा त्वचेला नुकसान पोहोचते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, पिंपल्स येणे, चेहरा निस्तेज दिसणे असा त्रास होतो. धावपळीच्या जीवनात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण अनेकदा असे ऐकले असेल की तांदळाचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का? तांदळासह डाळीच्या पाण्याचाही त्वचेला फायदा होत असतो. ( Benefits of Dal Water for skin )
आपण तांदूळ शिजवण्यापूर्वी ते धूतो आणि त्यातील पाणी टाकून देतो. परंतु हे पाणी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि मऊ राहते. तांदळाच्या पाण्यामुळे चेहरा निस्तेज दिसत नाही. या पाण्याने चेहरा धुतल्यास रंगही उजळतो.
डाळीच्या पाण्याचे फायदे
तांदळाच्या पाण्याप्रमाणेच, डाळींचे पाणी देखील तुमच्या त्वचेला फायदेशीर ठरू शकते. डाळ शिजल्यावर ते पाणी प्यावे. त्यात असलेले प्रथिने आणि खनिजे त्वचेसाठी फायदेशीर असतात आणि त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. याव्यतिरिक्त, मसूर किंवा मूग डाळीच्या पिठाचा वापर करून फेस पॅक बनवला तर चेहऱ्याचा रंग उजळतो.
निरोगी त्वचेसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करणे आवश्यक आहे. डाळ किंवा तांदळाचे पाणी देखील पूर्णपणे नैसर्गिक आहे, म्हणून तुम्ही ते वापरू शकता. शिवाय, दररोज रात्री चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा हायड्रेट राहते.
Comments are closed.