अमेरिकेला जशास तसे उत्तर मिळेल! चीनचा इशारा… टॅरिफ वॉर चिघळणार

शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर चीनने आज अमेरिकेला थेट इशारा देत अमेरिकेला जशास तसे उत्तर मिळेल, असे ठणकावले. त्यामुळे दोन्ही देशांत टॅरिफ वॉर चिघळण्याची चिन्हे आहेत.

दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध कठोर करण्याचा निर्णय चीनने घेतल्यानंतर ट्रम्प यांनी टॅरिफवाढीचा बॉम्ब टाकल्याने वादाला तोंड फुटले आहे.

n दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीसंदर्भात आमचा निर्णय कायदेशीर आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांना घाबरून तो बदलणार नाही. आमच्या व्यापारविषयक भूमिकेत सातत्य आहे. अमेरिकेचे काही आक्षेप असतील तर त्यांनी ते चर्चेतून सोडवावेत. धमक्यांनी काहीही साध्य होणार नाही. अमेरिका चुकीच्या मार्गाने जाणार असेल तर आम्ही योग्य ती पावले उचलू, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आम्हाला टॅरिफ युद्ध नको आहे, पण युद्धाला आम्ही घाबरतही नाही. धमक्या देऊन काहीही साध्य होणार नाही. डील करण्याचा हा योग्य मार्ग नाही, असे चीनने ठणकावले.

Comments are closed.