Maharashtra Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षां

गोसीखुर्द प्रकल्पासाठी शेकडो गावातील नागरिकांच्या शेती आणि गावा अधिग्रहित केलीत. मात्र 40 वर्षांचा कालावधी लोटलेला असतानाही अजूनही प्रकल्प बाधितांच्या अनेक समस्या निकाली निघालेल्या नाहीत. वारंवार आंदोलन करून, निवेदन देऊन प्रलंबित प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून भंडाऱ्यात प्रकल्प बाधितांचा अभिनव आरपार निवासी आंदोलन सुरू केलं. आज भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे नियोजन समितीच्या बैठकीला भंडाऱ्यात आलेत. दरम्यान, अभी नही तो कभी नही म्हणत प्रकल्पबाधित आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई – कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. प्रकल्प बाधितांचा आक्रमक पवित्रा बघतात पालकमंत्री भोयर यांनी नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर प्रकल्पबाधितांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून प्रलंबित समस्या जाणून घेतल्यात. यावेळी प्रकल्प बाधितांनीही त्यांच्या समस्या, निर्माण होणारी अडीअडचण आणि लालफितशाहीत अडकलेले त्यांचे प्रस्ताव किंवा प्रलंबित असलेले प्रश्न हे पोटतिडकीने मांडलेत. यावर पालकमंत्री भोयर यांनी….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत लवकरच प्रकल्पबाधितांची बैठक लावू, असं आश्वस्त केलं. यासाठी प्रकल्प बाधितांची 11 लोकांची समिती गठित करण्याच्या सूचनाही गोसेबाधितांना दिल्यात. पालकमंत्र्यांनी सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागील आठ दिवसांपासून सुरू असलेलं गोसे बाधितांच आरपार निवासी आंदोलन मागे घेण्यात आलं.

Comments are closed.