चार सामन्यात दोन विजय, दोन पराभव; सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी समीकरण काय?


महिला विश्वचषक 2025 इंड डब्ल्यू वि ऑस डब्ल्यू: आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये (India Women vs Australia Women) टीम इंडियाला आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 330 धावा करूनही, भारतीय महिला क्रिकेट संघाला तीन विकेट्सनी (Ind W vs Aus W) पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण काय असेल जाणून घ्या…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला तरी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा जिवंत आहेत. पुढील सर्व सामने भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. टीम इंडियाने आगामी तीन सामन्यांमधून एकही सामना गमावला तर सेमीफायनलचा मार्ग खूप कठीण होईल. टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांना अजूनही न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांशी खेळावे लागणार आहे.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी- (Women World Cup 2025 Points Table)

विश्वचषकाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ आहेत ज्यांनी अद्याप एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलिया 7 गुणांसह अव्वल स्थानी आहे. इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे, इंग्लंडने तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 6 गुण आहेत. दक्षिण अफ्रिका 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर, पाकिस्तान तळाशी (Women World Cup 2025)

गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे, त्यांच्याकडे 3 सामन्यांतून 2 गुण असून नेट रनरेट -0.245 आहे. तळाच्या तीन स्थानांवर आशियाई संघ आहेत, बांग्लादेशने 3 पैकी 1 सामना जिंकून सहावा क्रमांक मिळवला आहे. श्रीलंका एकाच गुणासह सातव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा संघ तीनही सामने हरल्यानंतर शेवटच्या पायरीवर म्हणजे आठव्या स्थानावर आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Comments are closed.