गुगलमुळे पंधरा वर्षांनी तरुणाची कुटुंबीयांशी भेट

गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून तब्बल पंधरा वर्षांपासून कुटुंबीयांपासून दुरावलेल्या तरुणाचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. शिरूर, दि. १२ (सा. वा.)

शिरूर तालुक्यातील पाबळ येथे सध्या वास्तव्यास असलेला बादल पात्र (वय ४०) हा पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांपूर्वी तो आपल्या कुटुंबीयांना सोडून महाराष्ट्रात आला होता. पाबळ येथे मोलमजुरी करत असताना तो स्थिरावला. पंधरा वर्षे त्याचा कुटुंबाशी कुठलाही संपर्क झाला नाही. शासकीय कागदपत्रे नसल्यामुळे त्याला मोबाईलचे सिम कार्ड मिळत नव्हते. मंगळवारी (दि. ७) तो पाबळचे सरपंच सोपानराव जाधव व पत्रकार प्रशांत मैड यांना भेटून कुटुंबाशी संपर्क साधायचा, असे सांगितले. त्याला फक्त गावाचे नाव माहीत असल्याने जाधव मैड यांनी गावाचे नाव गुगलवर सर्च करून नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील शेजारील एका गावातील एक मोबाईल नंबर गुगलद्वारे मिळाल्याने जाधव यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना बादल पात्रबाबत माहिती दिली. त्यांनतर दोन दिवसांनी जाधव यांना फोन करत कुटुंबाशी संपर्क झाल्याचे सांगून त्यांचा नंबर दिला. बादल त्याच्या कामाहून परत येताच जाधव यांच्या माध्यमातून बादलच्या कुटुंबीयांचे व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे झाले. मुलाशी बोलणे झाल्याने कुटुंबीयांच्या आनंदास पारावर उरला नाही. बादलचे आई, भाऊ व कुटुंबीयांनी तब्बल एक तास चर्

Comments are closed.