येणारं वर्ष भयंकर आर्थिक अस्थिरतेचं ठरणार! जगातील सर्वात बड्या गुंतवणूकदारानं सांगितले सुरक्षित


गुंतवणूकीचे पर्यायः ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध गुंतवणूक मार्गदर्शक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या महाभयंकर आर्थिक संकटाचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, येणारे वर्ष हे आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत अस्थिर असेल आणि त्यामुळे लोकांनी सध्या वापरात असलेल्या कागदी संपत्तीवर (Fiat Currency) अवलंबून राहू नये.

कियोसाकी यांनी त्यांच्या ‘रिच डॅड प्रोफेसी’ या पुस्तकात याच आर्थिक अस्थिरतेचा अंदाज यापूर्वीच वर्तवला होता. विशेषतः, निवृत्तीकडे झुकणाऱ्या ‘बेबी बूमर’ पिढीसाठी ही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अधिक धोकादायक ठरू शकते, असा त्यांचा दावा आहे. कियोसाकी अनेक वर्षांपासून लोकांना ‘प्रिंटेड एसेट्स’ म्हणजे चलनात गुंतवणूक न करण्याचा सल्ला देत आहेत. त्यांच्या मते, केवळ बचत करणारे लोक शेवटी हरतात.

सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय कोणते?

रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, सध्याच्या अनिश्चित वातावरणात गुंतवणुकीसाठी सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम यांसारखी स्थूल मालमत्ता (Tangible Assets) अधिक सुरक्षित ठरतील. त्यांनी विशेषतः चांदी व इथेरियमकडे अधिक लक्ष देण्याची त्यांनी शिफारस केली आहे. चांदीचा उपयोग औद्योगिक उत्पादनात होत असल्यामुळे त्याचे मूल्य दीर्घकाळ टिकते. त्याचप्रमाणे, इथेरियमचे ब्लॉकचेन तंत्रज्ञान विविध व्यवसायांमध्ये वापरले जात असल्यामुळे त्याला ‘डिजिटल गुंतवणुकीचा आधारस्तंभ’ मानले जात आहे.

त्यांच्या मते, सध्याचे दर तुलनेत कमी असल्याने ही मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट सांगितले की, गुंतवणूक करण्याआधी प्रत्येकाने स्वखर्चावर सखोल अभ्यास करावा आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवून पावले उचलावीत.

जागतिक व्यापार तणाव आणि क्रिप्टोची घसरण

दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नव्या तणावाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून, बिटकॉइन आणि इथेरियमसारख्या आघाडीच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्टेबलकॉइन किंवा इतर स्थिर मालमत्तांकडे वळवली आहे.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या घोषणेनंतर केवळ 27 तासांत 19 अब्ज डॉलर्सहून अधिक क्रिप्टो गुंतवणूक नष्ट झाली. बिटकॉइन 10% घसरून $1,10,000 पेक्षा खाली गेला, तर इथेरियम 11.2% खाली येऊन $3878 पर्यंत घसरला. XRP, Doge आणि Ada या इतर क्रिप्टोमध्ये देखील 19% ते 27% पर्यंत घसरण नोंदवण्यात आली.

गुंतवणुकीचा नवा दृष्टीकोन काय?

सध्या संपूर्ण जागतिक बाजार अनिश्चिततेच्या छायेत आहे. रॉबर्ट कियोसाकी म्हणाले की, फक्त बँकेत ठेवलेली रोकड किंवा पेपर करन्सीवर विसंबून राहणे योग्य नाही. त्याऐवजी लोकांनी असे पर्याय शोधावेत, जे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवू शकतात आणि भविष्यात आर्थिक संरक्षण देऊ शकतात.

ते क्रिप्टोकरन्सीला देखील दीर्घ मुदतीचा ‘वॅल्यू स्टोअर’ मानतात  विशेषतः इथेरियमला. कारण त्याचा व्यावसायिक आणि तांत्रिक उपयोग हे त्याचे अतिरिक्त मूल्य आहे. कियोसाकी यांनी केवळ धोक्याचा इशारा दिला नसून योग्य गुंतवणूक कशात करायची याची एक दिशाही दिली आहे. . ते सांगतात, श्रीमंती मिळवण्यासाठी फक्त पैसे वाचवणे पुरेसे नाही. समजूतदार गुंतवणूक, वेळेवर घेतलेले निर्णय आणि मूल्य असणाऱ्या संपत्तीत भागीदारी हेच खरे संपत्ती निर्माणाचे मार्ग आहेत. यांचे विचार अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.

आणखी वाचा

Comments are closed.