गुप्त दरवाजा उघडला अन् कार्यालयात सापडलं ‘भुयार’; कब्जा केलेला ‘तो’ बंगलाही सील, लोंढे पिता-पुत
नाशिक गुन्हा: नाशिक शहरातून एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. सातपूर (Satpur) येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा मुख्य आरोपी आरपीआय जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या (Prakash Londhe) कार्यालयात गुप्त दरवाजा आणि त्यामागे भुयार सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. हे प्रकरण केवळ कार्यालयपुरतंच मर्यादित नसून, लोंढे पिता-पुत्राच्या टोळीने गँगस्टर स्टाइलमध्ये जबरदस्तीने बंगलाही बळकावल्याचं उघडकीस आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर येथील आयटीआय पुलाजवळ प्रकाश लोंढे यांचे ‘धम्मतीर्थ’ नावाचे कार्यालय आहे. रविवारी सातपूर पोलिसांनी या कार्यालयावर धाड टाकली. प्रथमदर्शनी कार्यालय सामान्य वाटत होतं; आत फर्निचरच्या शोकेसेसची रचना होती. परंतु यातील एका शोकेसमागे गुप्त दरवाजा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
Nashik Crime: गुप्त दरवाजा उघडला अन् कार्यालयात सापडलं ‘भुयार’
प्रकाश लोंढेला विचारणा केली असता त्याने दरवाज्याच्या अस्तित्वाचा इन्कार केला. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने अखेर एका शोकेसमधून गुप्त चावी काढली आणि दुसऱ्या शोकेसमध्ये ती लावून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच पोलिसांना एक गुप्त भुयार सापडले.
Nashik Crime: भुयारात काय सापडलं?
गुप्त भुयारात प्रवेश करताच पोलिसांनाही काही काळ विश्वास बसला नाही. चित्रपटातील दृश्यांप्रमाणे भुयारात दोन स्वतंत्र बेडरूम्स, हत्यारांचा साठा आणि महागड्या मद्याच्या बाटल्या सापडल्या. कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे, अशी हत्यारे, विदेशी ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या, असा अंदाजे 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या भुयाराचा वापर गुन्हेगारी योजनांसाठी, गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा अवैध बैठका घेण्यासाठी केला जात होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Nashik Crime: पुष्कर बंगल्यावर जबरदस्तीने कब्जा
याच टोळीने खुटवडनगरमधील ‘पुष्कर बंगला’ जबरदस्तीने बळकावल्याची तक्रार 8 ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिस तपासात उघड झालं की, लोंढे पिता-पुत्रांनी मूळ मालकाला धमकावून बंगला हडपला होता. बंगल्याच्या कर्जाची अडचण आणि आर्थिक निकष यांचा गैरफायदा घेत टोळीने मालकाला जाणीवपूर्वक त्रास दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अखेर पोलिसांनी हा बंगला सील केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.