पाळीनंतर किती दिवसांनी गर्भधारणेची शक्यता असते? वाचा तज्ञांचे मत

आजकाल करिअर, आर्थिक नियोजन आणि इतरही काही कारणांनी गर्भधारणा लांबवण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परीणाम होतो. त्यामुळे एका विशिष्ट्य वयानंतर गर्भधारणा कठीण होते. अशा वेळी गर्भधारणेबाबतचे नियोजन करताना काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. जसे की, पाळीनंतर ४ दिवसांनी गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते असा समज असतो, पण यामध्ये कितपत तथ्य आहे? तज्ञांकडून जाणून घेऊया..

ओव्हुलेशन काळ लक्षात घ्या
तज्ञांच्या मते, मासिक पाळीसह ओव्हुलेशन कालावधी जाणून घेणे महत्वाचे आहे. गर्भाशयात अंड सुटण्याचा काळ म्हणजेच ओव्ह्युलेशनचा काळ असतो. मासिक पाळीच्या 7 ते 14 दिवस आधी ओव्हुलेशनची प्रक्रिया सुरू होते. महिलांची मासिक पाळी साधारण 28 दिवसांनतर येते. जर तुमची मासिक पाळी 28 दिवसांची असेल, तर 14 व्या दिवशी ओव्हुलेशन होऊ शकते. त्यामुळे ओव्हुलेशनच्या काही दिवस आधी आणि ओव्हुलेशनच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणेची सर्वाधिक शक्यता असते.

हेही महत्त्वाचे

  • जर तुम्ही गर्भधारणेची योजना करत असाल किंवा गर्भधारणेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • तुमचे वय, वैद्यकीय इतिहास आणि जीवनशैलीच्या आधारावर डॉक्टर तुम्हाला गर्भधारणेबाबत सल्ला देतात.
  • मासिक पाळीनंतर ओव्हुलेशनच्या वेळी गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते.
  • ओव्हुलेशनची वेळ शोधण्यासाठी तुम्ही ओव्हुलेशन किट, शरीराचे मूलभूत तापमान आणि गर्भधारणा कॅलेंडर वापरू शकता.
  • जर तुम्ही गर्भधारणेची योजना करत असाल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.

Comments are closed.