घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला आग, अनेकजण आत अडकल्याची शक्यता

मुंबईच्या घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.अग्निशन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील गोल्ड क्रेस्ट बिझनेस पार्क या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली आहे. आगीचे लोळ इमारतीच्यावरपर्यंत दिसत आहेत. फायर अलार्म वाजताच या इमारतीत काम करणारे अनेकजण इमारतीतून बाहेर पडले. तर काही जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढले.

गोल्ड क्रेस्ट ही पूर्णपणे व्यावसायिक इमारत असून अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून  इमारतीत अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

Comments are closed.