IND vs WI: बुमराह-स्टार्कला मागे टाकत, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी मोहम्मद सिराजची शानदार कामगिरी!

टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद सिराजची (Mohmmed Siraj) गोलंदाजी दिवसेंदिवस सातत्याने अधिक प्रभावी होत आहे. या वेगवान गोलंदाजाने विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया असो, इंग्लंड असो किंवा भारत – सिराजने आपले कौशल्य सर्वत्र दाखवले आहे.

2025 वर्ष ‘मियाँ भाई’साठी अविस्मरणीय ठरले आहे. कारण या वर्षी त्याने कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने केवळ प्रतिस्पर्ध्यांनाच नाही तर बुमराहसह (jasprit bumrah) सगळ्यांनाच मागे टाकलं आहे.

2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आता मोहम्मद सिराज ठरला आहे. त्याने झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीला मागे टाकले आहे. मुजरबानीकडे आतापर्यंत 36 विकेट्स होत्या, तर सिराज आता 37 विकेट्सह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

याशिवाय मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) 29, जसप्रीत बुमराहने 22 विकेट्स घेतल्या आहेत.

2025 मध्ये कसोटीतील सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

मोहम्मद सिराज – 37

आशीर्वाद मुजाराबानी – 36

मिशेल स्टारक – 29

नॅथन लायन – 24

जोमेल वॉरिकन – 23

जसप्रिट बुमराह – 22

शमर जोसेफ – 22

जोश टोंग – 21

वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या डावात सिराजने 9 षटकांत 16 धावा देऊन 1 विकेट घेतली. दुसऱ्या डावात त्याने 15 षटकांत 43 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या. म्हणजेच या कसोटीत एकूण 3 विकेट्स त्याने घेतल्या.

भारताने दुसऱ्या दिवशी 518 धावा करून डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात वेस्टइंडीज पहिल्या डावात 248 धावांवर गारद झाली. दुसऱ्या डावात मात्र वेस्टइंडीजने 390 धावा केल्या आणि भारतासमोर 121 धावांचे लक्ष्य ठेवले.

Comments are closed.