हे नाशिक आहे भावा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल
नाशिक गुन्हा: नाशिक शहरातील गुन्हेगारीला अंकुश आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) अॅक्शन मोडवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीला राजाश्रय देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. तसेच समाज माध्यमांवर दहशत निर्माण करण्याऱ्या रील्सवर देखील पोलिसांची करडी नजर आहे. या पार्श्वभूमीवर “हे नाशिक आहे भावा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटलं, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटलं…” असा धमकीवजा संवाद असलेलं रील व्हायरल करणाऱ्या दोन तरुणींचा माज नाशिक पोलिसांनी (Nashik Police) उतरवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला होता. हे नाशिक आहे भावा, तु येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हीलला भेटेल, #Nashik… असं या तरुणींनी आपल्या रीलमध्ये म्हटलं होतं.
Nashik Crime: नाशिकमधील ‘लेडी डॉन’चा माज पोलिसांनी उतरवला!
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध सुरु केला. पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. या तरुणींकडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला.’ असे पोलिसांनी वदवून घेतले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या घटनेनंतर आता नाशिकच्या पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
Pavan Pawar: रिल प्रकरणी पवन पवारवरही गुन्हा दाखल
दरम्यान, नाशिकच्या जेलरोड येथील माजी नगरसेवक पवन पवार व त्याच्या साथीदाराविरुद्ध “कोणी लागत नाही नादी,” असे रील तयार करून सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केलाय. नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरीत्या लावल्याप्रकरणी पवन पवार व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यातच पवन पवारसह संशयित वतन ब्रह्मानंद वाघमारे व त्यांचे साथीदार सोहेल पठाण, तथागत, आशिष वाघमारे, नीलेश भोसले यांनी त्यांचे फोटो वापरून या रीलद्वारे ‘कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, ओजीवाले गँगस्टर…’ अशा शब्दांत रील तयार केले होते. या संदर्भात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत थेट माजी नगरसेवक पवन पवार याच्यावरच पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.