Mumbai News – मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, आता व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीट काढता येणार

मेट्रोच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीटाची सुविधा उपलब्ध केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉटसअँप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात.

PeLocal Fintech Pvt. Ltd. यांच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या साठी “Hi” हा संदेश +91 9873016836 या क्रमांकावर पाठवू शकता किंवा स्थानकांवर लावलेल्या QR कोडला स्कॅन करून काही क्षणांतच आपले QR तिकीट उपलब्ध होते.

या सेवेद्वारे प्रवासी एका वेळी सहा QR तिकिट खरेदी करू शकतात. विविध पेमेंट पर्याय उपलब्ध असून, पेपर तिकीटाची आवश्यकता नाही. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देतो. युपीआयद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तर कार्ड पेमेंटसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.

Comments are closed.