Congress on MNS : मनसेचा बाणा, काँग्रेसची ना ना; आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?

मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबत विचारसरणी जुळत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बैठकीनंतर सपकाळ यांनी ‘एकटं राहायला पाहिजे’ असा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, ‘India Alliance मध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकत्रित देश पातळीवरचा हा निर्णय आहे.’ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची भावना वाढत आहे. दिल्ली हायकमांड राज ठाकरेबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. बैठकीत ‘भारत जोडो वाले आहोत, भारत तोडो वाले नाही’ अशी भूमिका देखील मांडण्यात आली. महाविकास आघाडीत मनसे सामील होणार का, यावर अजूनही चर्चा सुरू आहे.

Comments are closed.