श्रेयस अय्यरला मिळणार मोठी खुशखबर, मोहम्मद कैफ यांनी केली मोठी भविष्यवाणी

श्रेयस अय्यर सध्या भारताच्या टी-20 आणि वनडे संघातून बाहेर आहे. त्याची आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2024 साली खेळला होता. तर शेवटचा टी-20 सामना अय्यरने 2023 साली खेळला होता. मात्र आता अय्यरला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. मोहम्मद कैफ यांनी याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

मोहम्मद कैफ यांनी श्रेयस अय्यरची जोरदार प्रशंसा केली आणि त्याच्याबद्दल भविष्यवाणीही केली आहे. कैफ यांना वाटते की अय्यरचा राष्ट्रीय संघात लवकरच निवड होणार आहे. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “श्रेयस अय्यरला भेटून खूप छान वाटले. काय खेळाडू आहे. कसोटी पदार्पणात शतक, 2023च्या वनडे विश्वचषकातील हिरो, आणि तीन वेगवेगळ्या आयपीएल संघांना अंतिम फेरीत नेणारा एकमेव कर्णधार. टी-20 राष्ट्रीय संघातही तुझी निवड होईल. संयम ठेवा, उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे, श्रेयस.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी श्रेयस अय्यरला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी अय्यरने भारताकडून शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत खेळला होता. आता तो 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुन्हा मैदानात दिसणार आहे.

श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास, त्याने आतापर्यंत भारतासाठी 14 कसोटी सामन्यांत 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 70 एकदिवसीय सामन्यांत 48.22 च्या सरासरीने 2845 धावा केल्या आहेत. तर 51 टी-20 सामन्यांत या उजव्या हाताच्या फलंदाजाने 30.66 च्या सरासरीने 1104 धावा झळकावल्या आहेत.

Comments are closed.