वेस्टइंडीज नंतर 2025 मध्ये भारताची कोणत्या संघाशी लढत? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान चालू असलेली 2 सामन्यांची कसोटी मालिका आता अंतिम टप्प्यात आहे. दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे, जिथे भारतीय टीम (indian Cricket team) विजयाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
वेस्ट इंडीजशी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 3 सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल. या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा देखील खेळताना दिसतील.
ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर भारतीय टीम आपल्या घरेलु मैदानावर दक्षिण अफ्रीका संघाचे स्वागत करेल. भारत आणि दक्षिण अफ्रीकादरम्यान (Ind vs SA) दोन कसोटी, 3 वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका होईल. कसोटी मालिकेचा पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून खेळला जाईल.
वनडे मालिकेची सुरुवात 30 नोव्हेंबरपासून होईल, आणि शेवटचा सामना 6 डिसेंबरला खेळला जाईल. पाच सामन्यांची टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल, आणि अंतिम सामना 19 डिसेंबरला होईल.
Comments are closed.