Alliance Talks : ‘Congress ला कोणताही प्रस्ताव दिला नाही’ – MNS नेते संदीप देशपांडे
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) युतीच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना खासदार संजय राऊत, मनसे नेते संदीप देशपांडे आणि काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत. ‘Congress ला कोणताही प्रस्ताव दिला नाही’ अशी स्पष्ट भूमिका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मांडली आहे. संजय राऊत यांनी ‘Congress चा निर्णय दिल्लीत होतो’ असे थेट आरोप केले. काँग्रेसमध्ये ‘एकला चलो रे’चा सूर असून, स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार आहे. मनसे आणि काँग्रेसमध्ये विचारसरणी जुळत नसल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत नवीन घटक घ्यायचा असेल तर दिल्लीतील नेतृत्व निर्णय घेईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मनसेने नाराजी व्यक्त केली असून, राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही चर्चा सुरू आहे.
Comments are closed.