विदेशी दारूच्या बाटल्या, कुऱ्हाड, चाकू….; लोंढेच्या ‘गुप्त भुयारा’तून नाशिक पोलिसांना काय-काय
नाशिक गुन्हे प्रकाश लंडन: नाशिक शहरात सातपूर (Satpur) परिसरातील औरा बार गोळीबार प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या लोंढे टोळीचा मुख्य आरोपी आणि आरपीआय जिल्हाप्रमुख तसेच माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या (Prakash Londhe) कार्यालयात पोलिसांनी (Nashik Police) धाड टाकली असता, एक गुप्त दरवाजा आणि त्यामागे बनवलेलं भुयार सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime Prakash Londhe: गुप्त दरवाजा उघडताच भुयार सापडलं!
सातपूर आयटीआी पुलाजवळ असलेल्या ‘धम्मतीर्थ’ या कार्यालयावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला होता. सुरुवातीला हे कार्यालय सामान्य असल्याचे भासले होते. आतमध्ये फर्निचर, शोकेसेस, टेबल खुर्च्या अशा नियमित गोष्टी दिसत होत्या. मात्र एका शोकेसमागे गुप्त दरवाजा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. प्रकाश लोंढेला या संदर्भात विचारणा केली असता, त्याने दरवाजाचे अस्तित्वच नाकारले. परंतु अधिक तपासणी दरम्यान प्रकाश लोंढेने एका शोकेसमधून गुप्त चावी काढून दुसऱ्या शोकेसमध्ये लावली आणि दरवाजा उघडला.
Nashik Crime Prakash Londhe: भुयारात काय सापडलं?
दरवाजा उघडताच पोलिसांना चित्रपटातील दृश्यांची आठवण करून देणारे भुयार दिसले. भुयारात दोन स्वतंत्र बेडरूम्स, गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारची हत्यारे, आणि विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात खालील गोष्टींचा समावेश आहे:
– कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे यांसारखी धोकादायक हत्यारे.
– विदेशी ब्रँडच्या दारूच्या बाटल्या.
– अंदाजे 25 रुपये किंमतीचा मुद्देमाल.
Nashik Crime Prakash Londhe: लोंढेच्या कार्यालयातील डीव्हीआर जप्त
प्रकाश लोंढेच्या या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असून पोलिसांकडून त्याचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. यातून लोढेच्या कार्यालयात कोण-कोण येत होतं? याबाबत माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आणखी काही संशयित पोलिसांच्या हाती लागण्याचे बोलले जात आहे. आता डीव्हीआरमधून पोलिसांनी काय माहिती मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, लोंढे टोळीने खुटवडनगरमधील ‘पुष्कर बंगला’ जबरदस्तीने बळकावल्याची तक्रार 8 ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. लोंढे पिता-पुत्रांनी मूळ मालकाला धमकावून बंगला हडपला होता. बंगल्याच्या कर्जाची अडचण आणि आर्थिक निकष यांचा गैरफायदा घेत टोळीने मालकाला जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी हा बंगला सील केला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.