रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

भात हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि बंगालमध्ये भाताशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. पण, आरोग्याविषयी अधिक जागरुक असणाऱ्या लोकांचा भाताविषयी असा समज असतो की, रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने वजन वाढते आणि शुगर लेव्हलही बिघडते. ज्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक भात खाणेच बंद करतात. अशा परिस्थितीत खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. चला तर मग तज्ज्ञांच्या मते रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? हे जाणून घेऊयात

भातामुळे वजन वाढते?

भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात जे शरीराला ऊर्जा देतात. त्याचबरोबर त्यात प्रोटिन, व्हिटॅमिन B आणि काही मिनरल्सही असतात. पांढऱ्या तांदळामध्ये (रिफाइन्ड तांदूळ) जास्त कार्बोहायड्रेट्स आणि कमी फायबर असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात पांढरा तांदूळ खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. विशेष करुन तुम्ही जेव्हा मेहनत करत नसाल, तुमचे बैठे काम करत असाल, तेव्हा असे होण्याची शक्यता दाट असते.

हेही वाचा – पाळीनंतर किती दिवसांनी गर्भधारणेची शक्यता असते? वाचा तज्ञांचे मत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भातामुळे वजन वाढत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. भात आपल्या शरीराचा वैरी नाही फक्त तो खाण्याची योग्य वेळ माहीत असायला हवी. कारण भात खाण्याची योग्य वेळच आपल्या वजनावर आणि आरोग्यावर प्रभाव करते, असे तज्ज्ञ सांगतात. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात खाल्ल्यास आणि विशेषत: तुप-तेल, बटाटे, तळलेले पदार्थ यांसोबत खाल्ल्यास कॅलरी वाढतात आणि वजन वाढण्याची शक्यता असते.

भात खाण्याची योग्य वेळ –

आयुर्वेदात भात खायची एक ठराविक वेळ सांगण्यात आली आहे. त्यानुसार दुपारी भात खाण्याची योग्य वेळ आहे. दुपारच्या वेळेत शरीराची पचनशक्ती जास्त असते आणि भातापासून मिळणारी ऊर्जा दिवसभर वापरता येते. पण, जर तुम्ही रात्रीच्या जेवणात भात खाणार असाल तर हलकेच खा आणि त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. कारण रात्री शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते. पनचक्रिया मंदावलेली असल्याने भात पचायला वेळ लागतो आणि वजन वाढीला कारण ठरतो.

हेही वाचा – खरंच एक घास 32 वेळा चावायचा का? हेल्थ एक्सपर्टने सांगितले यामागील तथ्य

Comments are closed.