वेस्टइंडीजनंतर आता ऑस्ट्रेलियाची तयारी, कर्णधार गिल करणार खास सराव

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा अखेरचा सामना संपला आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ उद्या रवाना होणार आहे. शुबमन गिल कसोटी संघाचा कर्णधार बनल्यानंतर आपली पहिली कसोटी मालिका जिंकली आहे. शुबमन गिल आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी तो संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याला नवी जबाबदारी देण्यात आली असून, मालिकेपूर्वी त्याने मोठे वक्तव्य केले आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या विजयाबद्दल गिलने आनंद व्यक्त केला आहे.

वेस्टइंडीजला दुसऱ्या कसोटीत पराभूत केल्यानंतर शुभमन गिलला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याने वेस्टइंडीजविरुद्धच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, कारण भारतीय संघाकडे आता नियोजनासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. गिलने सांगितले की आता ते विमानात बसून तयारी करतील. तो हसत म्हणाला, “फ्लाइट खूप लांब आहे, कदाचित आम्ही फ्लाइटमध्येच प्लॅन तयार करू.”

Comments are closed.