ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना होऊ शकतात हाडांचे आजार
कोरोनाकाळात ऑनलाइन लेक्चर घेण्यास सुरुवात झाली. अनेक शाळा-कॉलेजसाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय होता. कोरोना काळ संपून आता दोन ते तीन वर्ष होत आली असली तरी सुद्धा आजही कित्येक शाळा ऑनलाइन लेक्चर्स घेतात. पण, ऑनलाइन लेक्चर्समुळे सतत एकाच जागी बसल्याने लहान मुलांमध्ये हाडांचे आजार उद्भवू शकतात. त्यांना लहान वयातच पाठीचा, मानेचा त्रास होण्यास सुरुवात होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, तासनतास ऑनलाइन क्लासमध्ये चुकीच्या पद्धतीने बसल्याने आणि शारीरिक हालचाल न झाल्याने मुलांमध्ये हाडांचे आजार वाढू शकतात. अशावेळी मुलांना हाडांच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल, हे समजून घेऊयात,
वापरा पुढील ट्रिक्स –
- प्रत्येक लेक्चरनंतर मुलांना ब्रेक द्यावा. या वेळात मुलांना एखाद्या खोलीत स्ट्रेचिंग करण्यास सांगावे. यामुळे डोळे, मान आणि पाठीच्या स्नायूंवरील ताण कमी होईल.
हेही वाचा – मासिक पाळी नियमित तर सगळे आजार दूर, स्त्रीरोगतज्ञांचा इशारा
- मुलांच्या डेस्कवर गॅझेट्स ठेवू नयेत. मुले ऑनलाइन लेक्चर्स अटेंड करताना त्यांचे पाय पूर्णपणे जमिनीला टेकलेले असावेत. स्क्रिन डोळ्यांसमोर असावी. थोडक्यात सांगायचे झाल्यास मुलांची डेस्क पोजिशन महत्त्वाची.
- लॅपटॉप किंवा मोबाईल समोर बसताना स्नायूंवर प्रेशर येते. त्यामुळे बहुतेक मुलं चुकीच्या पद्धतीने बसतात. अशावेळी मुलांना खुर्चीवर बसताना मागे टेकायला एक उशी द्यावी.
- ऑनलाइन लेक्चर्स ऐकण्यासाठी मुले मोबाइलचा वापर करतात. कसेही बसून, झोपून कधी कधी लेक्चर्स ऐकले जातात. ज्यामुळे मोबाइलची स्क्रीन अधिक जवळ वाटते आणि डोळ्यांना त्रास होतो.
हेही वाचा – खरंच एक घास 32 वेळा चावायचा का? हेल्थ एक्सपर्टने सांगितले यामागील तथ्य
Comments are closed.