IND vs WI: जे धोनी-रिषभ पंत करू शकले नाहीत, ती कामगिरी ध्रुव जुरेलने केली! रचला मोठा इतिहास
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team india) 2-0 शानदार विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात भारतातील अनेक खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. विशेषतः यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) खेळलेली शतकी खेळी प्रेक्षकांची मने जिंकून गेली. मात्र या विजयात विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलने (Dhruv jurel) इतिहास रचला. त्याने भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) विक्रम मोडीत काढला. जुरेलने ते साध्य केलं, जे एम. एस. धोनी (MS Dhoni) आणि ऋषभ पंत (Rishbh Pant) देखील करू शकले नाहीत.
ध्रुव जुरेलने भारतासाठी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळून कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने भारतासाठी 7 कसोटी सामने खेळले आहेत आणि भारताने सर्व सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह तो भारताचा असा पहिला खेळाडू ठरला ज्याने करिअरच्या सुरुवातीपासून सलग सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत.
यापूर्वी हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता. त्याने करिअरच्या सुरुवातीला सलग 6 कसोटी सामने जिंकले होते.
करिअरच्या सुरुवातीपासून भारतासाठी सलग सर्वाधिक कसोटी विजय
7* – ध्रुव ज्युरेल
6 – भुवनेश्वर कुमार
4 – करुन नायर
4 – विनोद कांबळी
4 – राजेश चौहान
इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ऋषभ पंत जखमी झाला होता. त्यामुळे तो संघातून दूर होता. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध जुरेलला संघात संधी मिळाली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 44 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात नाबाद 6 धावांवर परतला.
आतापर्यंत खेळलेल्या 7 कसोटी सामन्यांत जुरेलने भारतासाठी 47.77 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 1 अर्धशतक आहे. तर 4 टी-20 सामन्यांत त्याने भारतासाठी 14 धावा केल्या आहेत.
Comments are closed.