अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, खेडमधील वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापकावर आरोप, गुन्हा दाखल


रत्नागीरी गुन्हेगारीची बातमी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमधील लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीवर संस्थेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेड पोलिस स्टेशनमध्ये भगवान कोकरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी प्रतेश कदम याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून महिन्यापासून लैंगिक शोषण करत असल्याचीतक्रार अल्पवयीन मुलीनं दिली आहे. संस्थापक भगवान कोकरे यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे.

भगवान कोकरे यांच्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ

गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांच्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजे पोस्को अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे तसेच BNS 74,351(3) 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भगवान कोकरे यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करुन भगवान कोकरे यांना अटक करण्यात आली आहे.

ज्या नेत्यांनी गोशाळेत येऊन भाषणे केली त्यांना आसमान दाखवणार, भास्कर जाधवांचा इशारा

दरम्यान, या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भगवान कोकरे भाजपशी जोडलेले आहेत. ज्या नेत्यांनी गोशाळेत येऊन भाषणे केली त्यांना आसमान दाखवणार असल्याचा इशारा यावेळी भास्कर जाधव यांनी दिला आहे. लवकरच सभा घेऊन भगवान कोकरे याचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. भगवान कोकरे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा भास्कर जाधव यांनी आरोप केला आहे.

आळंदीतील वारकरी संस्थांमधील वसतीगृहांमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाचा आरोप

दरम्यान, पुण्यातील आळंदी परिसरात देखील अनेक वारकरी संस्था आहे. या वारकरी संस्थांमधील वसतीगृहांमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाबाबत अनेक तक्रारी येत होत्या.यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरु करण्यात आली होती.  याबाबत समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती दिली होती.  आळंदीमध्ये वारकरी शिक्षण देण्यासाठी तब्बल 175 शिक्षणसंस्था आहेत. ज्या संस्थांमध्ये तब्बल 5 हजार मुलं वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात. पण त्यातल्याच काही अनधिकृत संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळं आळंदी परिसर हादरुन गेला होता.

संताप! बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार; 8 दिवसातील दुसरी घटना

आणखी वाचा

Comments are closed.