पुरलेली डेडबॉडी काढून मेकअप करतात! इंडोनेशियातील शेकडो वर्षांची परंपरा

वेगवेगळ्या देशात वेगळ्या परंपरा आहेत. इंडोनेशियाच्या तोराजा मध्ये अशीच एक अनोखी परंपरा आहे. इंडोनेशियाच्या ताना तोराना परिसरात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी जुनी आणि अनोखी परंपरा आहे. त्या परंपरेला मानेने समारोह बोलले जाते. ही परंपरा तोराजा लोकांद्वारे शेकडो वर्षापासून पाळली जात आहे. दर तीन वर्षाने मृत व्यक्तींचे कुटुंबिय त्यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढतात.या अनोख्या परंपरेविषयी जाणून घेऊया
इंडोनेशियामध्ये मृत व्यक्तीचे कुटुंब आपल्या पूर्वजांच्या कबरी खोदून त्यांना बाहेर काढतात. त्यांचा छानसा मेकअप करुन त्यांना स्वच्छ कपडे घालतात.त्यांचे केस विंचरतात आणि फोटोही काढतात. या परंपरेचा उद्देश हाच असतो की, आपल्या पूर्वजांप्रती सन्मान आणि प्रेम दाखविणे आहे. तिथल्या लोकांचे मानणे आहे की मृत्यू म्हणजे अंत नाही, ते जीवनाचे आणखी एक रुप आहे.
या समारोहाच्या निमित्ताने कुटुंब आपल्या पूर्वजांना भेटल्याचे समाधान मिळते. हा समारोह दर तीन वर्षांनी असतो. त्यात संपूर्ण समुदाय सहभागी होतो. त्यानंतर पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन ते पुन्हा त्यांना कबरीत ठेवतात.
Comments are closed.