Diwali 2025: दिवाळीत मांसाहारी पदार्थ खावे की नाही? काय सांगतं शास्त्र
दिवाळी म्हटलं की घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे अशा पारंपरिक पदार्थांचा सुगंध घरभर पसरतो. पण या सणात एक प्रश्न कायम विचारला जातो दिवाळीत मांसाहार खाणं योग्य आहे का? काही जण या काळात पूर्णपणे मांसाहार टाळतात, तर काहींना तो केवळ प्रथांचा भाग वाटतो. मात्र, यामागे केवळ धार्मिक नव्हे तर आध्यात्मिक आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचं कारण दडलेलं आहे. (should we eat non veg during diwali festival)
दिवाळीचा काळ देवतांच्या आगमनाचा काळ
दिवाळी हा प्रकाशाचा सण मानला जातो. या काळात धनतेरसपासून भाऊबीजपर्यंत प्रत्येक दिवस देवतेशी जोडलेला असतो. या दिवसांत घरात स्वच्छता, पूजा आणि दीपदान यामुळे देवतांचं आगमन होतं, असं मानलं जातं. अशा पवित्र काळात सात्विकतेचा आग्रह धरणं हे केवळ धार्मिक कारण नसून, आपल्या मन आणि शरीराच्या शुद्धतेशी थेट जोडलेलं आहे.
सात्विक आहार का आवश्यक आहे?
भारतीय संस्कृतीत आहाराला “आचार” म्हटलं गेलं आहे. म्हणजेच आपण जे खातो, तसं आपलं मन होतं. सात्विक अन्न जसं की फळं, दूध, तूप, धान्य आणि भाज्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. तर तामसिक अन्न जसं की मांस, मद्य, कांदा-लसूण मनावर जडपणा आणतं आणि विचार नकारात्मक बनवू शकतं.
दिवाळीचा काळ हा देवी लक्ष्मीचं स्वागत करण्याचा असतो. आणि लक्ष्मीदेवी शुद्ध, शांत आणि सात्विक मनात वास करते, असं शास्त्र सांगतं. म्हणूनच या काळात मांसाहार टाळण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे.
शरीर ढवळत आहे
आपलं शरीर हे एक प्रकारचं हवनकुंड मानलं जातं. जसं हवनात शुद्ध वस्तू टाकल्याने वातावरण शुद्ध होतं, तसं शरीरात शुद्ध अन्न गेलं तर विचार आणि मन दोन्ही शुद्ध होतात. मांसाहार किंवा मद्यपानामुळे शरीरात अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे लक्ष्मी पूजेसारख्या पवित्र विधींमध्ये मन एकाग्र होत नाही, आणि देवतेची कृपा मिळण्यात अडथळा येतो.
आसुरी आणि दैवी प्रवृत्तीचा फरक
शास्त्रांनुसार, माणसात दोन प्रवृत्ती असतात दैवी (सकारात्मक) आणि आसुरी (नकारात्मक). मांसाहार आणि मद्य सेवनामुळे आसुरी प्रवृत्ती वाढते, असं मानलं जातं.\दैवी प्रवृत्ती टिकवण्यासाठी मन, वाणी आणि आहार हे तिन्ही शुद्ध ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिवसांत सात्विकतेचा आग्रह धरला जातो.
काही ठिकाणी अजूनही बलिदान देण्याची प्रथा आहे. पण प्राचीन धर्मग्रंथांनुसार, अशा बलिदानांचा उल्लेख नाही. त्याऐवजी भोपळा, नारळ, सीताफळ किंवा गोड फळं देवतांना अर्पण करण्याची परंपरा सांगितली आहे. अशा प्रतीकात्मक अर्पणांमधून हिंसामुक्तता आणि पवित्रतेचा संदेश दिला जातो.
दिवाळी म्हणजे फक्त रोषणाई, मिठाई आणि फटाक्यांचा सण नाही तो आत्मिक प्रकाशाचा सण आहे. म्हणूनच या दिवसांत मांसाहार टाळणं म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, आसुरी विचारांपासून दैवी ऊर्जेकडे वाटचाल करणं आहे. म्हणून शास्त्र कायम सांगत शास्त्र सांगतं जसं अन्न, तसं मन
Comments are closed.