चाहत्यांची चिंता वाढणार? गौतम गंभीर यांनी विराट-रोहित बाबत केले 'हे' विधान

भारताने वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत 2-0 ने हरवले आहे. यानंतर भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे कठीण आव्हान उभे आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे, ज्यात दोन्ही संघांदरम्यान 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले जाणार आहेत. सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. त्यांच्या भविष्यासंदर्भात आता हेड कोच गौतम गंभीरने आपले मौन सोडले आहे.

भारताने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यांनी काही प्रमाणात तेच सांगितले, जे काही दिवसांपूर्वी चीफ सेलेक्टर अजीत अगरकर यांनी म्हटले होते.

गौतम गंभीर म्हणाले, “वनडे वर्ल्ड कप अजून अडीच वर्षे दूर आहे. आपल्याला सध्या असलेल्या परिस्थितीबद्दल विचार करणे गरजेचे आहे. हे दोघेही उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, आणि मला आशा आहे की दोघांसाठी ऑस्ट्रेलिया दौरा चांगला जाईल.” विराट आणि रोहित 7 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळतील, त्यामुळे चांगली कामगिरी करण्याच्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांच्या साठी सोपे होणार नाही.

यापूर्वी अशी अफवा पसरली होती की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आधीच इशारा देण्यात आला आहे की आता त्यांना त्यांच्या मागील कामगिरीच्या आधारावर संघात ठेऊ शकत नाही. आता जर त्यांना वनडे सामने खेळायचे असतील, तर त्यांना सतत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जबरदस्त कामगिरी करत भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीशिवाय एकत्रितपणे टी20 वर्ल्ड कपही जिंकला आहे, पण वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी उचलण्याचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही.

Comments are closed.