Jalna News – वाढोणा तांडा येथील शाळकरी मुलांचा तलावात बुडून मुत्यू, गावावर शोककळा

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथील दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम गणेश आढे (11) आणि कुणाल कृष्णा आढे (13) आज (14 ऑक्टोबर 2025) पेपर संपवून घरी आले होते. शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे दोघेही खूश होते. त्यामुळे घरी आल्यावर दोघेही गावा शेजारी असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघेही देऊळगाव राजा येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये शिकत होते. यामध्ये ओम आढे पाचवीला तर कुणाल आढे सातवीला होता. सदरील मुले पाण्यात बुडाल्यानंतर तलावाच्या काठावर उभे असलेल्या दुसर्या मुलांनी आरडाओरडा केला. परंतु सर्व शेतीच्या कामात व्यस्त असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही. शेवटी या चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. सदरील दोघा मृतांना टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासणीअंती मृत घोषित केले व दोघांवर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
Comments are closed.