चूक मान्य; बंदी उठवा!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा हिंदुस्थानी कुस्तीपटू अमन सहरावतने आपली चूक स्वीकारली असून, राष्ट्रीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) आपल्यावरील एक वर्षाच्या बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. सहरावतवर झाग्रेब येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी निर्धारित वजन मर्यादेच्या 1.7 किलो अधिक वजनामुळे बंदी घालण्यात आली होती. ‘मी एक आठवडा आधीपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटच्या दिवशी फक्त 600-700 ग्रॅम बाकी होते, मात्र अचानक पोटदुखी सुरू झाल्याने वजन कमी करण्यात अपयशी ठरलो. वर्षभराच्या बंदीने कारकीर्दीला मोठा फटका बसेल. त्यामुळे बंदी उठविण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती अमनने ‘डब्ल्यूएफआय’कडे केली आहे.

Comments are closed.